Home शैक्षणिक करंजेकर फार्मसी महाविद्यालयाची दोन दिवसीय अभ्यास सहल…

करंजेकर फार्मसी महाविद्यालयाची दोन दिवसीय अभ्यास सहल…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाची दोन दिवसीय अभ्यास सहल आयोजित करण्यात आलेली होती.

          यात एकात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यावरण आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच औद्योगिक, पर्यावरण आणि देशाची संस्कृती कळावी हा अभ्यास सहल आयोजित करण्यामागचा प्रमुख हेतू. विद्यार्थ्यांनी रामटेक येथील मनसर पुरातत्वीय स्थळ, राम मंदिर व जैन मंदिर येथे भेट देऊन भारतीय पुरातत्त्व व सांस्कृतिक वारसा या बाबत माहिती करून घेतली.

          सायंकाळी आयोजित वैज्ञानिक सत्रात डॉ. ए.एन. इंगळे, प्राचार्य ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी रामटेक यांनी भारतातील फार्मसीची प्राचीन मुळे व आधुनिक औषध विकासातील त्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. रात्री फायर कॅम्प व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

           दोन दिवसीय अभ्यास सहलीत दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार (नागपूर) येथे औद्योगिक भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवात्मक शिक्षण घेतले. यावेळी गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापर येथे गाईंपासून मिळणाऱ्या पदार्थांवर आधारित नैसर्गिक औषधी उत्पादने तयार करण्याचे संशोधन व उत्पादन कार्य कसे केले याची संपूर्ण वैज्ञानिक अभ्यासात्मक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

          याप्रसंगी गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारचे कोषाध्यक्ष डॉ. संजय एकापुर व्यवस्थापक प्रशांत पिसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर पर्यावरणीय अभ्यास म्हणून खिंडसी तलाव परिसराचा पर्यावरणीय अभ्यास करण्यात आला.

         या शैक्षणिक अभ्यास सहली करिता संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ.ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर अभ्यास सहलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आतिश शहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. शैक्षणिक अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी समस्त प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.