माणूस जेव्हा रानटी अवस्थेत राहत होता, त्याचा धर्म आणि त्याची संस्कृती ही रानटीच होती. सुरुवातीला तू एकटाच राहत होता, प्राण्यांची शिकार करून कच्चे मास खात होता, आणि फळे खाऊन राहत होता, नंतर अग्नीचा शोध लागला आणि कच्चे मास तो भाजून खाऊ लागला. नंतर तो टोळी करून राहू लागला. माणसे जेव्हा टोळीटोळीने राहत होते त्यावेळी त्यांचे भटकने चालूच होते, ते स्थिर नव्हते, सामूहिकपणे शिकार करायचे, भाजून खायचे. ज्या जंगलात शिकार करायचे तिथेच ते राहायचे. नंतर माणसाला शेतीचा शोध लागला, टोळ्या स्थीर झाल्या.
माणूस एकटा असतानाचा त्याचा धर्म आणि त्याची संस्कृती तसेच टोळी करून राहत असताना चा त्याचा धर्म आणि संस्कृती तसेच शेती करताना माणसाचा धर्म आणि त्याची संस्कृती भिन्नभिन्न आहेत, म्हणजे त्या बदलत गेल्या.
कालांतराने राजा आणि त्याचा देश निर्माण झाले. या स्टेजला माणसाचा धर्म आणि त्याची संस्कृती पहिल्यापेक्षा वेगळीच झाली.
माणसाला देव सुचला, देवाची आराधना पद्धत सुचल्या. यातून अनेक धर्म निर्माण झाले, अनेक धर्मासोबत अनेक संस्कृती पण निर्माण झाल्या.
माणसाच्या बुद्धीचा जसा जसा विकास होत गेला, या विकास प्रक्रियेत, माणसाच्या बुद्धीचे दोन प्रकार पडले, संकुचित बुद्धी आणि व्यापक बुद्धी. पुढे संकुचित बुद्धीचा पण विकास होत गेला आणि व्यापक बुद्धीचा पण विकास होत गेला, संकुचित बुद्धीच्या लोकांना अनेक देव दिसले तर व्यापक बुद्धीच्या माणसांना देव एकच दिसला.
देवाची आराधना म्हणून माणसाने धर्म काढला, त्या धर्माची संस्कृती निर्माण केली, देवाची आराधना आणि व्यवहार येथे व्यवहारातील चालीरीती रूढी परंपरा तयार केल्या. यातून संस्कृती निर्माण झाली, परंतु जेव्हा जेव्हा संस्कृतीत विकृती निर्माण झाली तेव्हा तेव्हा नवीन धर्म आणि नवीन संस्कृती जन्मास जन्मास आल्या निर्माण झाल्या.
मुळात देवाची आराधना म्हणून एक संस्कृती निर्माण करण्यात आली, प्रार्थना पूजा पाठ रुढी परंपरा तयार झाल्या, बार्शी लग्न मृत्यू खानपान पोशाख यात धर्मानुसार विविधता निर्माण झाली, म्हणजेच विविध धर्म आणि विविध संस्कृती निर्माण झाल्या.
या धर्माचा आणि संस्कृतीचा स्वार्थी लोक आणि राजकीय लोक घेऊ लागले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा जोपासण्यासाठी धर्माचा आणि संस्कृतीचा फायदा घेणे चालू झाले.
मुळात माणूस रानटी होता, त्याचे विचारही रानटी होते, बळी तो कान पिळी या जंगली कायद्याप्रमाणे तो वागत होता, पुढे त्याचे शिकार करणे भटकणे बंद झाले आणि तो स्थिर झाला, आणि त्याच्या विचारात फरक झाला, तो स्वतः बरोबरच इतरांचा पण विचार करू लागला, त्याच्या विचारात दया क्षमा शांती सहकार्य या गोष्टीची निर्मिती झाली. याचा अर्थ तो संकुचित बुद्धीचा वापर करण्याऐवजी व्यापक बुद्धीचा वापर करू लागला. आणि ह्या स्टेजला तो परिपूर्ण माणूस बनला. परंतु माणूस जेव्हा संकुचित बुद्धीचा वापर करतो त्यावेळी तो परत रानटी अवस्थेत जातो, आणि नको ते उपद् व्याप करु लागतों.
माणसाचा धर्म हा त्याच्या व्यापक बुद्धीत असतो, आणि अधर्म हा त्याच्या संकुचित बुद्धीत असतो. संकुचित बुद्धी माणसाला स्वार्थ शिकवते, आणि व्यापक बुद्धी माणसाला निस्वार्थ शिकविते, स्वतः सोबतच इतरांचा विचार करायला लावते. केवळ स्वतःचाच विचार करून व्यवहार करणे म्हणजे स्वार्थ होय, स्वार्थ म्हणजे विकृती होय, इतरांचा विचार करणे म्हणजेच संस्कृती होय. परंतु संस्कृतीची व्याख्या आपण फक्त धार्मिक विधी करणे एवढाच केलेला आहे, जी व्याख्या ही चुकीची आहे.
माणसाचा धर्म म्हणजे, आपण इतरांचे मन दुखणार नाही अशा पद्धतीचा व्यवहार करणे, किंवा आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे वर्तन ठेवणे. याचा अर्थ माणूसकी हा माणसाचा धर्म होय. आणि मानवता ही धर्माची संस्कृती होय. थोडक्यात काय तर, माणुसकी हा माणसाचा धर्म आणि मानवता ही धर्माची संस्कृती होय.
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे म्हणजेच जनावरासारखे वागू नये, आणि धर्माची संस्कृती म्हणजेच एका धर्माने दुसऱ्या धर्माबरोबर माणुसकीच्या नात्याने वागावे, माणूस म्हणून वागावे, जनावर सारखे वागू नये. जनावरांना अक्कल नसते त्यांची बुद्धी कमी असते, म्हणून ते इतरांशी स्वार्थी दृष्टीनेच वागतात, त्यात काही हिंस्र प्राणी इतरांची शिकार करतात तर भित्रे प्राणी हिंस्र प्राण्याची शिकार असतात. जनावरांची ही संस्कृती माणसात असू नये. माणसाने जंगली कायद्यांचा वापर करू नये, हीच खरी संस्कृती होय.
माणसाचा धर्म हा माणसा बरोबर माणसासारखे वागविण्यास शिकविते, आणि धर्माची संस्कृती ही रुढी परंपरा निर्माण करते, त्यारोडीन परंपराचा जेव्हा माणसाला अभिमान वाटतो किंवा गर्व निर्माण होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात, माणूस आपला धर्म विसरतो आणि धर्माच्या संस्कृती प्रमाणे वागायला लागतो, माणसाला माणसाचा धर्म प्रिय वाटणे ऐवजी, पारंपारिक धर्माची संस्कृतीच प्रिय वाटायला लागते, महत्त्वाची वाटायला लागते, म्हणून माणूस हा धार्मिक बनतो, धार्मिक बनवणे इतर धर्माचा द्वेष करायला लागतो. द्वेष मत्सर सोड भावना, अहंकार ह्या विकृती माणसात येतात. धर्मांध झाल्यामुळे. खरे तर धर्माच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याऐवजी आपण माणूस असलेल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. माणुसकी मानवता मानवता धर्म, माणसाचा धर्म हा धर्माच्या संस्कृती पेक्षा किंवा ही श्रेष्ठच आहे. याची जाणीव प्रत्येकाला असणे जरुरीचे आहे.
या पृथ्वीतलावर मानवाची जात जर टिकवायची असेल तर, धार्मिक युद्ध थांबविली पाहिजेत, आणि मानवाचा धर्म म्हणजे माणुसकी जपली पाहिजे. मानवाचा धर्म आचरणात आणला पाहिजे. पारंपारिक धर्म आणि पंथ यांना दुय्यम स्थान दिले पाहिजे. तरच या पृथ्वीतलावर मानव जात टिकेल अन्यथा ही जातच नष्ट होईल, काळाच्या ओघात जशा काही स्पेशल नष्ट झाल्या तशा, उदाहरणार्थ डायनासोर. या प्राण्याची जातच नष्ट झाली. नवे ही जात नष्ट केल्या गेली आणि ती माणसानेच डायनासोर हे प्राणी नष्ट केले, कारण डायनासोर हे माणसांनाच खात सुटले होते. डायनासोर हा प्राणी माणसाच्या जीवावर उठला होता म्हणून माणसाने त्यास नष्ट केले, परंतु आता मात्र माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे, मानव जातीला दुसरा कोणी प्राणी नष्ट करायला निघाला नाही, तर, माणूसच माणसाला नष्ट करायला निघालेला आहे, माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला आहे, आणि तोही जात आणि धर्माच्या नावाने, आणि इथेच माणसाच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
अर्थात माणूस हा माणुसकी का विसरतो आहे? तो इतरांचा विचार करायला का तयार नाही ? माणूस एवढा धर्मांध का झाला ? माणूस सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी तो इतरांची जीव का घ्यायला तयार होतो आहे ? याचे कारण म्हणजे येथील विषमतावादी आर्थिक आणि सामाजिक विषमता हे होय, समता प्रस्थापित झाल्याशिवाय मानव जातीवरील हे भयानक संकट दूर होणार नाही.



