Home Political भिसी नगरपंचायत मध्ये भाजपा-काॅंग्रेस-अपक्ष उमेदवार विजयी… — नगराध्यक्ष भाजपाचे,पण भिसी येथील...

भिसी नगरपंचायत मध्ये भाजपा-काॅंग्रेस-अपक्ष उमेदवार विजयी… — नगराध्यक्ष भाजपाचे,पण भिसी येथील मतदारांचा कौल समान…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

          चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील भिसी नगरपंचायतीचा निकाल समोर आला असून भाजपाचे अतुल पारवे ५२१ मतांची आघाडी घेत नगराध्यक्ष झाले आहेत.

            तर भाजपाचे ८ नगरसेवक,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ७ व अपक्ष दोन उमेदवार निवडून आले असल्याने भिसी येथील मतदारांनी कुणाच्याही बाजूने कौल दिला नसल्याचे दिसून आले आहे.

            नगरपंचायतीच्या निकालानंतर नगराध्यक्ष सह भाजपाचे ९ तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ७ व अपक्ष २ नगरसेवक असे बलाबल असल्याने भिसी येथे चुरशीची निवडणूक झाली असेच म्हणावे लागेल.

             नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतले भाजपाचे अतुल पारवे यांना २७४०,अपक्ष उमेदवार विक्की कटारे यांना २२१९,तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आकाश पाटील यांना २२०२ मते मिळाल्याने आणि भाजपाचे ८ नगरसेवक,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ७ नगरसेवक,अपक्ष २ नगरसेवक निवडून आल्याने भिसी येथील मतदार हे सर्वांच्याच बाजूने समान उभे राहिले असे म्हणता येईल.

          भिसी येथे निवडून आलेले २ अपक्ष उमेदवार हे तेथील नगरपंचायतची शक्ती बनले आहेत.मात्र ते भाजपा पक्षात गेले तर त्यांचे महत्त्व कमी झालेले असेल.

        याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले ७ उमेदवार भिसी येथील मतदारांसाठी नवीन उमेद असेल…

वृत्त संकलन…

उपक्षम रामटेके/मुख्य कार्यकारी संपादक…

शुभम गजभिये/विशेष प्रतिनिधी..