Home Political चिमूर नगरपरिषद भाजपाकडे… — आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यावर चिमूरच्या मतदारांनी दाखवला...

चिमूर नगरपरिषद भाजपाकडे… — आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यावर चिमूरच्या मतदारांनी दाखवला अतुट विश्वास!…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये.

          चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागला असून भाजपाने आपला गड कायम ठेवला आहे.भाजपाच्या गिता लिंगायत यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर मात करुन नगराध्यक्ष पदी स्वतः विजयी होत भाजपच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे.

         चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल बघता नगराध्यक्षासह १४ नगरसेवक भाजपाच्या झोळीत चिमूरच्या मतदारांनी टाकले आणि भाजपाला स्पष्ट बहुमत दिले.

            यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यावर चिमूर नगरपरिषद हद्दीतील मतदारांनी परत एकदा भक्कम विश्वास दाखवला आहे.आमदार किर्तीकुमार भांगडीया हे भेदभाव न करता चिमूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार हा अतुट विश्वास तेथील स्थानिक मतदारांचा त्यांच्यावर आहे हेच नगरपरिषद निकालांनी पुढे आणले आहे.

            चिमूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल बघता आमदार किर्तीकुमार भांगडीया,नगराध्यक्ष गिता लिंगायत व १४ नगरसेवक यांना तेथील मतदारांची मने सदैव आपल्या बाजूने ठेवण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हव्यात,असा मतदारांचा कौल त्यांना मनातून सांगतो आहे…

        विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.तरी पण चिमूर येथील नागरिकांचा विकास करण्यासाठी व त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया हे यशस्वी होतील असा आशावाद चिमूर येथील जनतेला असावा,हेच नगरपरिषद निकाल सांगतो आहे.

          राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ४ उमेदवार निवडून आले असून २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.निवडून आलेले एक अपक्ष नगरसेवक हे भाजपाचेच आहे.