Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — मौजा दाबकाहेट्टी येथील श्री.आकाश सुधाकर सहारे यांनी केली...

ब्रेकिंग न्यूज… — मौजा दाबकाहेट्टी येथील श्री.आकाश सुधाकर सहारे यांनी केली आत्महत्या…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा दाबकाहेट्टी येथील श्री.आकाश सुधाकर सहारे वय २४ वर्ष या तरुण शेतकऱ्यांनी आज अंदाजे ५ वाजता आपल्या राहते घरी आत्महत्या केली.

       आत्महत्य्याचे कारण घरातील व गावातील कुणालाही माहीत नाही.श्री.आकाश सुधाकर सहारे यांनी गळफास लावून आत्महत्या केली त्यावेळी घरी कुणीही नव्हते.

        त्याच्या पश्चात पत्नी स्वाती,२ मुले,आई शोभा,असा आप्तपरिवार आहे.

        भिसी पोलिसांना घटनेची माहिती दिली असून,ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.त्यांच्याकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे.पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपरुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात येणार आहे.