भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) व नाबार्ड बँक यांच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या शाश्वत उपजीविकेसाठी एकात्मिक बोडी आधारित शेती प्रणाली या प्रकल्पाअंतर्गत नुकताच प्रकल्प विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये पाणलोट क्षेत्र विकास व एस.आर.आय. (SRI) शेती पद्धत, मत्स्य पालन, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड तसेच शेळी पालन व कुक्कुट पालन या विविध विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतले आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे, त्यांचे जीवनमान उंचावणे व दीर्घकालीन शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा होता. एकात्मिक शेती प्रणालीमुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळून शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रकल्प विस्तार कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरून ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला गती देत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला GDCC कारवाफा बँकचे मॅनेजर वासेकर साहेब ग्रामपंचायत चे सचिव भांडेकर साहेब उमेद अभियानाचे श्रीमती हलामी मॅडम गावातील सरपंच अनिल दळाजे साहेब नाबार्ड बँकेचे प्रतिनिधी चव्हाण सर साखेरा येथील गाव पाटील सोनू पोटावी गाव भूम्या बाजीराव पोटावी आदिवासी समिती पुस्टोला चे अध्यक्ष उमेश पुडो सचिव दुधराम कोवाची , सदस्य तुळशीराम मडावी या कार्यक्रमाला वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे शन्मुख मडावी टेक्निकल ऑफिसर , अतुल गौरकर सामाजिक अधिकारी तारेंद्र ठाकरे कृषी तज्ज्ञ, राकेश पाकमोडे पशूतज्ज्ञ निखिल आसुटकर सामजिक अधिकारी , शुभम वैरागडे टेक्निकल ऑफिसर अक्षय पेद्दीवार सामाजिक अधिकारी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्प तज्ज्ञ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



