शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप कदम यांनी केवलसिंग जुनी यांची चिमुर ग्रामिण तालूका प्रमुखपदी नियुक्ती केली.
या कार्यकर्ता बैठकीत जिल्हा प्रमुख भास्कर ताजने,उपजिल्हा प्रमुख अमित आखाडे,विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते,विधान सभा समन्वयक देवीदास गिरडे,शहर तालूका प्रमुख सुधाकर निवटे,नागभिड तालूका प्रमुख भास्कर शिंदे,तालूका समन्वयक बंडू पिसे,शहर प्रमुख निखिल लोणारे,शहर संघटक मनोज तीजारे,राजेंद्र जाधव,समीर बल्की किशोर उरांडे,बंडू पारकी,सुरेश गजभे,बाळकृष्ण पांडव,सारंग धाबेकर,सुनिल हिंगणकर,शार्दुल पचारे व आजी-माजी इतर शिवसैनिक उपस्थित होते.
केवलसिंग जुनी हे शिवसेना उबाठा पक्षाशी एकनिष्ठ असून चिमूर तालुक्यात त्यांनी मागील २० वर्षात शिवसेनेचे भरीव कार्य केले आहे.
चिमूर तालुक्यात त्यांचा दांडगा परिचय असून ते ग्रामीण भागात शिवसेना उबाठा मजबूत करतील असा आशावाद चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख यांना आहे.



