शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील आम्रवन दिक्षाभूमी सुगत कुटी येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जुनेद खान यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
आम्रवन दिक्षाभूमी सुगत कुटी येथे दरवर्षी १६ व १७ डिसेंबरला धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.याचबरोबर इतर कार्यक्रमासह मार्गदर्शनाचा कार्यक्रम असतो.
हजारो बौद्ध उपासक-उपासिका व इतर नागरिक आम्रवन दिक्षाभूमी सुगत कुटी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.
या धम्म देशनेच्या कार्यक्रमाला अनुसरून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जुनेद खान यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत आम्रवन दिक्षाभूमी सुगत कुटी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध व युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनःपुर्वक अभिवादन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.



