शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मौजा मालेवाडा येथील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा नळ योजना अंतर्गत केला जात असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मौजा मालेवाडा हा गाव बराच मोठा आहे.या गावातील नागरिकांना नळ योजना अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो आहे.
पण,या गावात ग्रामपंचायत देखरेखीखाली होणारा पाणीपुरवठा हा दुषीत असल्याची ओरड तेथील नागरिकांची आहे.
तेथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्राम विकास अधिकारी यांनी मौजा मालेवाडा येथील नागरिकांना होणारा दुषीत थांबवावे व टाकीतील मळ काढावे,पाण्याच्या टाकीला धुवून घ्यावेत अशी मागणी गावकऱ्यांची आहे.



