Home Political समाजकार्याची ओळख, राजकारणात नवा अध्याय, वंदना आल्हाट महापालिका रणांगणात…

समाजकार्याची ओळख, राजकारणात नवा अध्याय, वंदना आल्हाट महापालिका रणांगणात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पिंपरी-चिंचवड : सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वंदना हिरामण आल्हाट यांनी यंदा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाकडून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात असून, त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

          वंदना आल्हाट यांनी गेल्या अनेक वर्षांत परिसरातील मूलभूत प्रश्न, महिला स्वावलंबन, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपक्रम तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी थेट नाळ जोडली आहे. ‘समाजासाठी काम’ हीच आपली ओळख जपत त्यांनी विविध स्तरांवर विश्वासार्ह नेतृत्व उभे केले आहे.

         भाजपच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेल्या आल्हाट यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे प्रभाग ३ मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक प्रगती हा आपला अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

          दरम्यान, वंदना आल्हाट यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे प्रभाग ३ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, निवडणूक लढत रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.