भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिं 16 डिसेंबर रोज बुधवार ला ग्रामपंचायत चातगाव अंतर्गत मौजा चातगाव येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत वानखेडे गट विकास अधिकारी प. स. धानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून व श्रमदानातून जुने क्रीडांगण नव्याने दुरुस्ती करून सुसज्ज असे नवीन क्रीडांगण निर्मिती करण्यात आली.
या क्रीडांगनावर 400 मीटर धावपट्टी , 8.5 मीटर गोला फेक ट्रॅक व डबल बार तयार करण्यात आले. या ट्रॅक वर गावांतील 25 ते 30 विद्यार्थी तसेच बरेचसे नागरिक दररोज व्यायाम करतात. तसेच या विद्यार्थ्यांना नियमितपणे पोलिस स्टेशन चातगाव कडून सरावाचे प्रशिक्षण देण्यात येते.
हा स्तुत्य उपक्रम असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल हा ट्रॅक तयार करताना ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांचा मोलाचा वाटा आहेत ग्रामपंचायत चातगाव कडून खेळांचे काही साहित्य देण्यात आले. तसेच साहित्य कमी पडल्यास ग्रामपंचायत पुरवठा करणार असे ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांनी आश्वासन दिले.
हा ट्रॅक ग्रामपंचायत कडून सुसज्ज बनविण्यात देण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले आहेत.हा ट्रॅक तयार करतांना श्रमदानाच्या वेळी पुढील विध्यार्थी आदित्य नंदेश्वर, रोशन जराते,हेमंत सहारे,हितेशजराते,शुभम मडावी,जितेंद्र मगरे,देवा भुसारी,गौरव मडावी,प्रणय तोरे,विठ्ठल अलाम ,निकिता बावणे,बबिता कुमरे,अनन्या ठाकरे ,बादल सुरपाम इत्यादी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक जीवन पाटील वड्डे ,ग्रामपंचायत सदस्य राजू ठाकरे,राहूल बावणे , नितीन कोत्तावर , जितू आत्राम , सुखदेव शेडमाके उपस्थित होते.
क्रिडांगनाचे उद्घाटन जीवन पाटील वड्डे यांचे हस्ते करण्यात आले. या उपक्रमात उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांनी मानले.



