Home Social आकाशवाणीच्या स्वरपरिक्षण स्पर्धेत भावेश कोटांगले व चमू अव्वल… — लोकसंगीतासाठी नागपूर...

आकाशवाणीच्या स्वरपरिक्षण स्पर्धेत भावेश कोटांगले व चमू अव्वल… — लोकसंगीतासाठी नागपूर येथे झाली होती स्पर्धा…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

       प्रसार भारती, भारत का लोकसेवा प्रचारक आकाशवाणी नागपूर अंतर्गत लोकसंगीत अर्थात पारंपारिक लोकगीत स्वरपरिक्षण स्पर्धा दि. २७ आक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात साकोली तालुक्यातील एकोडी येथील प्रबोधनकार भावेश कोटांगले व चमू तसेच रमाई भजन मंडळाने सहभाग घेतला होता. 

        यासाठी स्मृतिशेष मनोज कोटांगले यांनी मृत्यूपूर्वी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु दुर्देवाने त्यांचे निधन झाल्याने ते या स्पर्धेत जावू शकले नाही मात्र त्यांची जिद्द त्यांचे बंधू प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी पूर्ण केली.

        या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून यात स्मृतिशेष मनोज कोटांगले यांच्या आशीर्वादाने भावेश कोटांगले यांची चमू लोकसंगीत स्पर्धेत मध्ये यशस्वीरित्या पात्र ठरली असून त्या संदर्भात आकाशवाणीतर्फे पत्र प्राप्त झाले आहे.यात प्रबोधनकार भावेश कोटांगले, प्रबोधनकार सुभाष कोठारे, संदिप कोटांगले, तेजस मनोज कोटांगले, लक्ष्मीकांत बोरकर, राजू उईके, मलिक यांचा सहभाग होता.

         या स्पर्धेसाठी सदर चमूला रोख पारितोषिक देखील मिळाले असून गरजेनुसार आकाशवाणीवर पारंपारिक लोकगीते सादर करण्यासाठी चमूला आमंत्रित केले जाणार आहे. या यशाबद्दल भावेश कोटांगले व चमूचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.