Home उपक्रम “आमचा गाव आमचा विकास,कार्यशाळा संपन्न… — गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी...

“आमचा गाव आमचा विकास,कार्यशाळा संपन्न… — गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी केले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       “आमचा गाव आमचा विकास,या विषयाला अनुसरून पंचायत समिती चिमूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

           गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी,”आमचा गाव आमचा विकास,या विषयावर खुलासेवार व आवश्यक मार्गदर्शन केले.याचबरोबर संबंधित विस्तार अधिकारी यांनी सुद्धा विषयावर प्रकाश टाकला.

          दिनांक 16/12/२०25 ला पंचायत समिती चिमूर येथे झालेल्या कार्यशाळेत सरपंच व ग्रामसेवक यांनी सहभाग घेतला होता.

          चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावात विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना,कामाचे व निधीचे नियोजन,समन्वय,केंद्र व महाराष्ट्र शासनाचा गाव विकासाच्या बाबतीतला हेतू “आमचा गाव आमचा विकास,कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आला.