प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
गाव विकास,गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा आणि त्यावरील उपयोजना लक्षात घेता केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा उद्देश साध्य करण्यासाठी मौजा महादवाडी येथील,”जल जीवन मिशन योजना अंतर्गत प्रकरण चिघळायला नको,यासाठी सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे स्वतःहून पुढे यायला पाहिजे आणि हेच खरे त्यांचे कर्तव्य आहे.
जल जिवन मिशन योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी येथे पावसाळ्याच्या तोंडावर उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी विविध कामाला सुरुवात करायला नको होती हे तितकेच वास्तव आहे.

उपविभागीय अभियंता पोटुडे आणि उपकंत्राटदार पवन बंडे यांना माहिती होते,की एक महिन्यात पावसाळा सुरु होणार आहे आणि जल जिवन मिशन योजना अंतर्गत मौजा महादवाडी येथील कामे पूर्ण करु शकणार नाही.
तरीही पावसाळ्याच्या तोंडावर उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या द्वारा मौजा महादवाडी येथील जल जीवन मिशन योजना अंतर्गत कामांना गती देण्यात आली.
मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरचे परत खोदकाम करताना सदर विहीर खचली व वाॅल अंदर दबला गेला.वाॅल नेमका कुठे दबला गेला याची माहिती सध्यातरी उपविभागीय अभियंता पोटुडे,कनिष्ठ अभियंता पल्लवी मेश्राम,उपकंत्राटदार पवन बंडे यांना नाही.

विहीर खचने,वाॅल अंदर जमीनीमध्ये जाने,आणि मौजा महादवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यातील चार महिने अस्वच्छ पाणी पुरवठा होणे,हा घटनाक्रम सरपंच भोजराज कामडी यांना मनस्ताप व त्रास देणारा ठरला.यामुळे त्यांनी सरपंच या हक्काने जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांना मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
या मागणीला अनुसरून मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट तात्काळ बसवून देण्यासाठी उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी हालचाली केल्यात व उपकंत्राटदार पवन बंडे यांच्या मदतीने आर-ओ-प्लाॅन्ट चे काम पूर्ण करण्यासाठी विना प्रशासकीय मंजुरीने प्रयत्न केलाय व मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट तात्काळ बसवून देण्याची लेखी सुध्दा सरपंच भोजराज कामडी यांना त्यांनी दिली.
यामुळेच उपविभागीय अभियंता पोटुडे स्वतः जाणिवपूर्वक फसले गेले.चंद्रपूर जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे आर-ओ-प्लाॅन्ट मंजूरीचा प्रस्ताव उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी सादर केला नाही,मंजूरी घेतली नाही.शिवाय ते आर-ओ-प्लाॅन्ट बाबत सरपंच भोजराज कामडी यांना खेळवत राहिले.
आर-ओ-प्लाॅन्ट चे काम करण्यासाठी ५ लाख रुपयांच्यावर निधी खर्च होणार असल्याने,हा निधी आणायचा कुठून हा प्रश्न उपकंत्राटदार पवन बंडे यांच्या समोर उभा ठाकला होता.
विना मंजुरी,उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी म्हणावे व मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट चे काम उपकंत्राटदार पवन बंडे यांनी करावे इतके सहज आणि सोपे काम नव्हते.
मात्र,उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी व वेळ मारुन नेण्यासाठी उपकंत्राटदार पवन बंडे व सरपंच भोजराज कामडी यांना नाहक त्रास दिला हे स्पष्टच आहे.

एखादा वरिष्ठ व जबाबदार उपविभागीय दर्जाचा अभियंता असलेले व्यक्ती हे वेळ मारुन नेण्यासाठी जाणिवपूर्वक सरपंच भोजराज कामडी सोबत बनवाबनवीचा प्रकार करत होते हे सहाजिकच लक्षात येते.
परंतु सरपंच भोजराज कामडी यांना व मौजा महादवाडी येथील नागरिकांना गढुळ पाण्याचा झालेला नाहक त्रास याचे काय?हा खरा प्रश्न आहे.
तद्वतच उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी सरपंच भोजराज कामडी यांच्या सोबत केलेल्या घटनाक्रमाचा प्रकार हा बेकायदेशीर व बनवाबनवीच्या कृतीचा असल्याने ते स्वतःच्या जबाबदारीला कसे घेतात आणि मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट कोणत्या योजना अंतर्गत बसवून देतात हे बघायला मिळणार आहे.
तद्वतच सरपंच भोजराज कामडी हे,”आर-ओ-प्लाॅन्ट,प्रकरणाला कशाप्रकारे हाताळतात हे सुद्धा कळेलच!
पण,मौजा महादवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात अस्वच्छ पाण्यामुळे झालेला नाहक त्रास बेहद दुःखद् व भयानक त्रासदायक होता.
मौजा महादवाडी येथील नागरिकांना सतत चार महिने गढुळ पाणी पाजणारे उपविभागीय अभियंता पोड्डुटे हे फक्त आठ दिवस गढुळ पाणी पेणार काय?






