शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
रिपब्लिकन सेनेचे चिमुर तालुका पदाधिकारी,चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सरडपार येथे आज दिनांक १५/१२/२०२५ रोज सोमवारला तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मागील १० वर्षांपूर्वी चिमूर तालुक्यातील मौजा सरडपारला ग्रामपंचायत मधून वगळले होते.कारण होते चिमूरला नगरपरिषद बनविने..
तेव्हापासून आजातागायत मौजा सरडपारला कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही.यामुळे मौजा सरडपार येथील नागरिकांना चिमूर तहसील कार्यालयाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी,चिमूर पंचायत समिती येथील संबंधित अधिकाऱ्यांनी,जिल्हा परिषद चंद्रपूर येथील संबंधित अधिकाऱ्यांनी,चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी,”मुलभूत व इतर आवश्यक सुविधांपासून आणि योजनांपासून मागील १० वर्षांपासून वंचित केले.
संबंधित चार कार्यालयातील अधिकाऱ्यांची कार्यपद्धत मौजा सरडपार वाशियांवर अन्याय करणारी ठरली व त्यांचे शोषण करणारी ठरली.
संबंधित मग्रुर,अहंकारी आणि हुकुमशहा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे मौजा सरडपार येथील नागरिकांना झालेला नाहक त्रास अतिशय वेदना व दुःख देणारा ठरला आहे.
मौजा सरडपार वाशियांवर होणारा अन्याय हा जाणिवपूर्वक कार्यपद्धतीचा भाग असल्याने संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी व त्यांच्याकडून मूलभूत सुविधांपासून व योजनांपासून वंचित केल्याप्रकरणी रुपये वसूल करण्याचा दावा उच्चनायालयात करायला हवा असेच गंभीर प्रकरण मौजा सरडपारचे आहे.
मौजा सरडपार येथील नागरिकांच्या भेटीनंतर रिपब्लिकन सेना चिमुर तालुका पदाधिकाऱ्यांनी मौजा सरडपार गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चय केला आहे.
योग्य कर्तव्याचा कार्यभाग लक्षात घेता संपूर्ण चिमूर तालुका टिम मौजा सरडपार गावात दाखल झाली व त्यानंतर गावातील समस्या जाणुन घेतल्या.
या गावात अनु.जाती आणि अनु.जमाती समुदायाची जवळपास ६०० लोकसंख्या आहे.या गावात इतर समुदाय १% आहे.त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता रिपब्लिकन सेना पक्षाचे चिमूर तालुका पदाधिकारी पुढे सरसावले आहेत.
मौजा सरडपार वाशियांना भेटी प्रसंगी,चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम,तालुका उपाध्यक्ष प्रविण शंभरकर,भिम आर्मीचे चिमुर तालुका अध्यक्ष आषिश बोरकर,तालुका नियोजन अध्यक्ष संकेत जांभुलकर,भिम आर्मीचे युवा कार्यकर्ते अभिषेक जिवतोडे,सतीश भैसारे,प्रज्वल मेश्राम,यांचा सहभाग होता.



