Home Social गजानन माऊली भजन मंडळ नेरी द्वारे समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू…. ...

गजानन माऊली भजन मंडळ नेरी द्वारे समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू…. — सामाजिक जागृती आणि सामाजिक एकोपा जपल्या जातय भजना द्वारे…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         विविध संत-महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित भजन गायन करणे हे समाज प्रबोधनाचे,समाज जागृतीचे व समाज एकसंघतेचे उत्तम सांस्कृतिक कार्य असून,”असेच उत्तम सामाजिक कार्य चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील,”गजानन माऊली भजन मंडळ नेरीच्या,द्वारे मागील २० वर्षांपासून सातत्याने करणे सुरू आहे.

           मौजा नेरी येथील,”गजानन माऊली भजन मंडळामध्ये, सौ.इंदूबाई सुरेश गभणे,सौ.बेबीताई जाणबाजी बुटले,सौ.निर्मला नथ्यूजी खाटीक,सौ.मंदा बाळकृष्ण खाटीक,सौ.सकुंतला विलास नरड,सौ.वर्षा भुषण भलमे,श्री.विलास संभाजी नरड,सौ.चंदा चंद्रशेखर गिरडकर,सौ.रजनी देवराव पाकमोडे यांच्यासह इतर नागरिकांचा समावेश आहे.

             गजानन माऊली भजन मंडळ हे समाजाचे वैचारिक उत्थान करण्यासाठी व समाजिक जागृतीसाठी मागील २० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले होते..

            तेव्हा पासून आजतागायत गजानन माऊली भजन मंडळ नेरीच्या द्वारे समाज प्रबोधनाचे व समाज एकसंघतेचे कार्य सातत्याने सुरू आहेत.

            गजानन माऊली भजन मंडळ नेरीच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक संत-महापुरुषांच्या सामाजिक कार्यावर आधारित भजनाचे गायन केले जात आहे.

          यामुळे गजानन माऊली भजन मंडळ नेरीच्या माध्यमातून विविध भजना द्वारे उत्कृष्ट समाजसेवा व समाज प्रबोधन होत आहे.