Home Maharashtra मौजा महादवाडी येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी सरपंच भोजराज कामडी संघर्ष करतात,तर उपविभागीय...

मौजा महादवाडी येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी सरपंच भोजराज कामडी संघर्ष करतात,तर उपविभागीय अभियंता खोटे बोलतात की वेळ मारुन नेतात?… — अस्वच्छ पाणी पुरवठा करणे व त्यातंर्गत मौजा महादवाडी येथील नागरिकांना अस्वच्छ पाणी पाजणे हा उपविभागीय अभियंत्यांनी केलेला गंभीर गुन्हाच!. — सरपंच १७ डिसेंबर २०२५ ला आत्मदहन करणार? — कंत्राटदार शुभम उदापुरे की पवन बंडे?,खऱ्या – खोट्या कंत्राटदारावरुनही वाद उफाळण्याची शक्यता…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक…

          संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्या कॅबिनमधील बैठकीत ठरल्या प्रमाणे मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट,”जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे बसवून देत नसल्याने सरपंच भोजराज कामडी यांनी त्यांच्या कार्यालयापुढे १७ डिसेंबर २०२५ रोज बुधवारला आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

           जल जिवन मिशन अंतर्गत नळ योजना अन्वये मौजा महादवाडी येथे विविध प्रकारचे कामे करण्यासाठी १ करोड रुपयांची प्रशासकीय मंजुरी असल्याचे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे.

             कंत्राटदार शुभम उदापुरे यांच्या नावाने मौजा महादवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत कामाचा कंत्राट करारनामा असून त्यांनी चिमूरच्या पवन बंडे यांना मौजा महादवाडी येथील काम करण्याचा अवैध मार्गाने तथा बेकायदेशीर ठेका दिला असल्याचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या लेखी पत्रावरुन समोर आले आहे.

          उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या वर्क ऑर्डर नुसार उपठेकेदार पवन बंडे यांनी पावसाळा लागण्याच्या १ महिना अगोदर मौजा महादवाडी येथे जल जिवन मिशन योजना अंतर्गत कामांना प्रारंभ करण्यात आले होते.

             अगदी पावसाळ्याच्या तोंडावर मौजा महादवाडी येथे स्वच्छ पाणि पुरवठा करणारी विहीर उपठेकेदार पवन बंडे यांनी परत खोदली.सदर विहीर खोदताना खचली व विहिरीतील वाॅल अंदर दबला गेला.सदर वाॅल चा शोध जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता,कनिष्ठ अभियंता आणि उपकंत्राटदार पवन बंडे यांना घेता आला नाही.

           ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मौजा महादवाडी येथे जल जिवन मिशन योजना अंतर्गत कामांना प्राधान्य देत प्रारंभ करणे अयोग्य व चुकीचे होते.

             पण,”करु झाले काय आणि वर आले पाय,या म्हणी प्रमाणे मौजा महादवाडी येथील नागरिकांसाठी वाईट काळ वाट पहात होता.उपठेकेदार व संबंधित उपविभागीय अभियंता यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे मौजा महादवाडी येथील नागरिकांवर,”वाईट काळाने,झडप टाकली आणि पावसाळ्याच्या दिवसात चार महिने तेथील नागरिकांना अस्वच्छ पाणी प्यावे लागण्याची वेळ त्यांच्यावर उपठेकेदार पवन बंडे व उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्याद्वारे आणल्या गेली.

            अस्वच्छ पाणी पुरवठ्याच्या वाईट काळात सरपंच भोजराज कामडी यांना तेथील नागरिकांनी घेरले व स्वच्छ पाणी पिण्याचा आमचा मुलभूत अधिकार हिसकावू नका अशी मागणी त्यांच्याकडे रेटून धरली.

          गावात होणाऱ्या अस्वच्छ पाणी पुरवठ्याची समस्या सरपंच भोजराज कामडी यांनी आपल्या परिने संबंधित अधिकाऱ्यांकडे लावून धरली.जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी त्यांना लेखी दिली की मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी,”आर-ओ-प्लाॅन्ट तात्काळ बसवून देत आहोत.

          मात्र,उपविभागीय अभियंता पोटुडे यांना वेळ मारुन न्यायची होती असे त्यांच्या बेजबाबदार कृतीतून दिसून येते आहे.यामुळेच त्यांनी भर पावसाळ्यात मौजा महादवाडी येथील नागरिकांना अस्वच्छ पाणी पाजले व गटविकास अधिकारी चिमूर यांच्या कॅबिनमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णया नुसार मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लाॅन्ट चे काम सुध्दा केले नाही.

         लोकप्रतिनिधी असलेल्या सरपंच भोजराज कामडी यांना घुमविणे,त्यांच्यासोबत खोटे बोलणे,हे जबाबदार असलेल्या उपविभागीय अभियंता पोटुडे यांची अयोग्य व बेजबाबदार कृती सरपंच भोजराज कामडी यांच्या पुढे आली.

              मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासंबंधाने सरपंच भोजराज कामडी यांना नाहक त्रास उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी दिला असल्याने त्यांनी गावातील नागरिकांच्या हितासाठी आत्मदहन सारखी गंभीर भूमिका घेतली व ते १७ डिसेंबरला २०२५ रोज बुधवारला जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय चिमूर पुढे आत्मदहन करणार असल्याचे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे.

कंत्राटदार कोण?…

        मौजा महादवाडी येथे जल जिवन मिशन योजना अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा खरा ठेकेदार शुभम उदापुरे आहे.त्यांनी पवन बंडे यांना मौजा महादवाडी येथील काम दिल्याचे समजते.यामुळे पवन बंडे हे उपठेकेदार असल्याचे लेखी वरुन पुढे आले.

          मात्र,ज्या ठेकेदाराच्या नावाने मौजा महादवाडी येथील जल जीवन मिशन योजना अंतर्गत कामांचा करारनामा झाला,त्या कंत्राटदाराला दुसऱ्या ठेकेदाराला परस्पर लिखीत कामाचा ठेका देता येतो काय? आणि ठेका उपविभागीय अभियंता पोटुडे यांना मान्य आहे काय?,हा प्रश्न सुध्दा तितकाच महत्वाचा आहे.

 ठेकेदारावरुन वाद चिघळण्याची शक्यता?..

         गटविकास अधिकारी चिमूर यांच्या कॅबिनमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सरपंच भोजराज कामडी यांनी आर-ओ.प्लाॅन्ट कामाबाबत उपठेकेदार पवन बंडे यांच्या सोबत चर्चा केली होती.त्यांनी मी ठेकेदार नसल्याने आर-ओ-प्लाॅन्ट चे काम मौजा महादवाडी येथे करुन देणार नाही असे म्हटले होते.

        यावरून सरपंच भोजराज कामडी व उपठेकेदार पवन बंडे यांच्यात कायदेशीर शाब्दिक वाद झाला होता असे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे.

        ज्या उपठेकेदार पवन बंडे यांनी मी ठेकेदार नसल्याने मौजा महादवाडी येथे आर-ओ-प्लॅन्ट चे काम करुन देणार नाही असे सरपंच भोजराज कामडी यांना म्हटले होते,तेच उपठेकेदार पवन बंडे कनिष्ठ अभियंता पल्लवी मेश्राम हे सरपंच भोजराज कामडी यांना ५ दिवसांपूर्वी पत्र द्यायला गेले होते.नेमके पत्र कशाबद्दल होते हे कळू शकले नाही.

         पण,सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे की उपठेकेदार पवन बंडे हे मौजा महादवाडी येथील जल जीवन मिशन योजना अंतर्गत कामांचा ठेकेदार नसल्याने आता त्यांना महादवाडी येथील उर्वरित काम करु देणार नाही.यामुळे ठेकेदार वाद चिघळण्याची शक्यता आहे..