युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये पूर्वी दिलेल्या निवेदनातील समस्यांविषयी सर्वप्रथम चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात) या दोनच संघटनांची निवेदनातील प्राप्त समस्या बद्दल सद्यस्थिती काय आहे.याबद्दल शिक्षण विभाग चे अधिक्षक मंगेश मानकर यांनी सभागृहाला अवगत केले. सभेमध्ये इतर संघटना प्रतिनिधींनी आपआपल्या समस्या मांडल्या. लवकरच अनुपालन अहवाल संघटनेला देण्यात येईल असे प्रशासनाचे वतीने सांगण्यात आले.
अखिल संघाचे वतीने सुरज मंडे, उमेश शिंदे, भूषण बागडे, इंदिरा पोटेकर यांनी आपल्या समस्या मांडल्या तर शिक्षक सेनेच्या वतीने प्रविण ढोके यांनी, शिक्षक भारतीच्या वतीने राजु खिराडे आणि विनोद वानखडे यांनी, संभाजीराव थोरात गट महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने गणेश भगत यांनी, शिक्षक परिषदेच्या वतीने सुदर्शन चामलोट यांनी तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्याचे वतीने पंडित भोयर आणि सुभाष विघ्ने यांनी समस्या मांडल्या. अनिल कोल्हे यांनी केंद्रप्रामुख्यांच्या समस्या मांडल्या. शिक्षक समितीच्या वतीने छगन चौधरी व गजानन कावलकर यांनी तर दिव्यांग कर्मचारी संघटना यांचे वतीने विजय खानजोडे व राजू डांगे यांनी उपस्थिती दर्शविली.
या सभेकरिता गटशिक्षणाधिकारी प्रसाद संपकाळ, विलास बाबरे, वैशाली महाजन विस्तार अधिकारी शिक्षण, विलास राठोड, बाळासाहेब मुंडे, नितीन ठाकरे, बलदेव घुगे, अविनाश आढाव सर्व केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभाग मधिल संदीप बिलबिले, प्रतिक बोरकर, सुशिल कटके तर लेखा विभाग मधिल रूपेश देशमुख, आणि इतर सर्व कर्मचारी व शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



