सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत, तसेच गोरगरीब व गरजु लोकांना सुध्दा मदत केली जात आहे, साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात लोकोपयोगी कामे केली जात आहेत, त्यामुळेच साथ फाऊंडेशन चे कार्य हे प्रंशासनिय आहे,असे प्रतिपादन आ.बंटी भांगडिया यांनी केले,ते बोथली सांस्कृतिक महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते…
रोहितभाऊ बोम्मावार मित्रपरिवार तर्फे बोथली येथे ‘ बोथली सांस्कृतिक महोत्सव २०२५ ‘या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी उद्घाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ.बंटी भांगडिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गड्डमवार तर प्रमुख उपस्थिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहीत बोम्मावार ,माजी आम.नामदेव उसेंडी,प्रशांत वाघरे, गणेश तर्वेकर, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, महामंत्री सतीश बोम्मावार, पोलिस निरीक्षक प्रदीप पुलरवार बोथली ग्रामपंचायतचे सरपंच सुशील नरेड्डीवार, उपसरपंच विजय गड्डमवार भोगेश्वरजी मोहुर्ले, आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आम.नामदेव उसेंडी यांनी आपले मत व्यक्त करतांना बोथली या गावात मी अनेकदा आलो,इथले राजकारण मला माहीत आहे, परंतु साथ फाउंडेशनच्या माध्यमातून उपस्थित झालेली अलोट गर्दी आणि एखाद्या महानगर सारखे निर्माण झालेले वातावरण व उत्साहात तरुणाई थिरकणारी हि साथ फाऊंडेशनचेच योगदान असुन ज्यांना आजवर जणु शकले नाही ते रोहित बोम्मावार यांनी आपल्या सामाजिक कार्यक्रमातून दाखवून दिले, त्यामुळे त्यांचे कार्य इतरांना हेवा वाटणारे आहे, असे मत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताराचंद खोब्रागडे, संचालन सुरज बोम्मावार तर आभार निलेश पुटकमवार यांनी केले.
‘बोथली सांस्कृतिक महोत्सवात गायिका श्रृती जैन,गायक मुकेश कुमार यांनी सरस गित सादर केले,तर नृत्यांगना भुमिका दुपारचे बहारदार नृत्य आणि कॉमेडियन अजवले यांनी विविध सिने अभिनेत्यांचे आवाज काढून प्रेक्षकांचे मने जिंकले…



