अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत…
चिखलदरा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची ट्रॅव्हल गाडी परत जाताना,”चिखलदरा ते परतवाडा रोडवर पर्यटक महिलांना उलट्या झाल्यामुळे आडनादीजवळ थांबविण्यात आली होती.
वाहन चालकाने गाडी थांबवली व खाली उतरला.परंतु त्याने हॅन्ड ब्रेक लावलाच नाही त्यामुळे गाडी पुढे पुढे जात होती आणि नंतर गाडी त्याच्या अंगावरून गेली.
गाडी त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.वाहान चालक मृतकाचे नाव सुमित वानकर वय 35 असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे.
काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.सुमीतचा मृतदेह चिखलदरा पोलिसांनी बाहेर काढला असून शवविच्छेदन करण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटना आज दुपारी साडेतीन वाजताची असून वाहन क्रमांक :- d.d.03,T.9048 असा आहे.(ट्रॅव्हलर फोर्स गाडी होती.),चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला.



