Home Social ड्रीम चंद्रपूर व मित्र आणि परिवारा तर्फे स्मृतिशेष लोकेश वाळके याचा पहिल्या...

ड्रीम चंद्रपूर व मित्र आणि परिवारा तर्फे स्मृतिशेष लोकेश वाळके याचा पहिल्या स्मृतिदिनानिमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन….

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

             डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर आणि लोकेश वाळके व मित्र परिवारातर्फे स्मृतीशेष लोकेश वाळके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिनांक 14/12/2025 रोजी शासकीय रक्तकेंद्र, शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात बऱ्याच रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात महिलांनी सुद्धा रक्तदान केले.

       या शिबिरात मिनाक्षी वाळके, मुकेश वाळके, कांचन खोत भटकर, तेजस दुर्गे, सावण चालकुरे, प्रशांत भंगा, मोहन रामटेके, प्रियंका जुमडे, किरीटिरी कन्नोडे, नकुल देऊलकर यांनी रक्तदान केले.

          या रक्तदान शिबिरात ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे, सचिव अनिल ठाकरे, उपाध्यक्ष अभिजित दुर्गे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे, प्रशांत देवगडे (दानवर्धन), अश्विनी वाळके भटकर, अमित भटकर, मोहन रामटेके, रिंकू पाटील, दुशांत नगराळे, सचिन दुधे, गजानन अल्लेवार, गुरमीत सिंग, मिल्का गावंडे, भावना रामटेके, सुनीता दानवर्धन यांनी परिश्रम घेत शिबिराला यशस्वीरित्या संपन्न झाले.