Home Maharashtra शंकरपूर परिसरात वाघाची दहशत,वनविभागाची निष्क्रियता चरमसीमेवर… — नागरिकांचा संताप उफाळला,उपसरपंच अशोक...

शंकरपूर परिसरात वाघाची दहशत,वनविभागाची निष्क्रियता चरमसीमेवर… — नागरिकांचा संताप उफाळला,उपसरपंच अशोक चौधरी यांचा तीव्र इशारा — शंकरपूर परिसर पुन्हा एकदा हादरला… — वनविभागाची चमू वाघाच्या शोधात…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      कवडशी (देश) येथील शेषराव झाडे (वय अंदाजे 52 वर्षे) यांची शंकरपूरवरून परतताना वाघाने केलेली निर्घृण शिकार ही घटना केवळ दुर्दैवी नाही,तर वनविभागाच्या बेफिकीर,निष्क्रिय आणि जबाबदार नसलेल्या कारभाराचा ज्वलंत पुरावा आहे असे उपसरपंच अशोक चौधरी यांनी म्हटले आहे.

          मृतदेह शंकरपूर–कवडशी मार्गालगत आढळताच परिसरात भीतीचे सावट तर पसरलेच,परंतु नागरिकांचा संतापही उफाळून आला आहे अशी उपसरपंच अशोक चौधरी यांची संतप्त प्रतिक्रिया आहे.

           उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला की,”वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत त्यांनी अनेक वेळा वनविभागाला निवेदने दिली.”“परंतु वनविभागाने एकाही निवेदनाची दखल घेतली नाही.”“आजचा बळी हा त्याच निष्क्रीयतेचा थेट परिणाम आहे.”

“आणखी किती बळी घेतल्यावर वनविभागाला जाग येणार?”

       त्यांनी इशारा दिला आहे की वाघाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास आणि ठोस सुरक्षा उपाय केले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,ज्यात—

रास्ता रोको,वनविभाग कार्यालयावर ठिय्या,जनमोर्चा,

प्रशासनाविरोधात व्यापक आंदोलन यांचा समावेश असेल.

         या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी वनविभागावर राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांची भूमिका..‌‌.

       परिसरातील नागरिकांनीही वनविभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे,“आम्ही घरा-बाहेर पडायलादेखील घाबरत आहोत.

वनविभागाकडे ठोस मागण्या…

      1.वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा उभारणी व पकड मोहीम सुरू करावी.

2. मृत कुटुंबाला त्वरित भरपाई जाहीर करावी.

3. परिसरात २४ तास गस्त,ड्रोन पथक,मोबाईल रेस्क्यू टीम तैनात करावी.

4. वारंवार निवेदन देवूनही दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.

5. संपूर्ण शंकरपूर परिसरासाठी दीर्घकालीन मानवी–वन्यजीव संघर्ष टाळण्याची स्वतंत्र योजना जाहीर करावी.

        उपसरपंच चौधरी यांनी स्पष्ट संदेश दिला की,“नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्क्रीय यंत्रणेला आता जाग येणे आवश्यक आहे.अन्यथा

शंकरपूरसह परिसरातील लोक शांत बसणार नाहीत!…

बाॅक्स..

वनविभाग…

       वनविभागाच्या चमूने दिनांक ०९ डिसेंबरच्या रात्रभर व आज १० डिसेंबरला दिवसभर हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शोध मोहीम राबवली.

        हल्लेखोर वाघांचा अधिवास जाणून घेण्यासाठी व या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्थीचे प्रयत्न वनविभागाच्या चंमूकडून सुरु आहेत.

     किशोर देऊळकर 

  वनपरिक्षेत्राधिकारी चिमूर..

बाॅक्स…

        वन्यप्राणी व मानवप्राणी हा संघर्ष होवू नये आणि वाघांनी मनुष्यप्राण्याचा बळी घेवू नये अशी वनविभागाची अपेक्षा आहे..

          मा.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे आम्ही पालन करु….

     रामदास नैताम 

        वनपाल