युवराज डोंगरे
उपसंपादक
राज्यातील स्वयं अर्थसहाय्यीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे भाडे करारनामा शासनाने तथा शिक्षण विभागाने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सब रजिस्ट्रार रजिस्ट्रेशन फी 500 रुपये करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)वतीने देण्यात आले.
राज्य शासनाने आर. टी. इ. मान्यता प्राप्त शाळेना त्रुटी पत्र देऊन सहाय्यक निबंधक यांच्याकडे करारनामा जोडण्याचे निर्देश दिले आहेत यात शहरी भागातील इंग्रजी शाळांना दिड लाख व ग्रामिण भागातील इंग्रजी शाळांना साठ हजार रुपये संस्थानी करण्याचे नमूद केले आहे.
मात्र हा खर्च संस्थानिक यांना करणे शक्य नाही भाडे करारनामा हा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 500 रुपये करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनच्या (मेस्टा ) वतीने संजय लहाने यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.



