युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था, नालवाडा या संस्थेचे अध्यक्ष स्व.सुधाकररावजी साबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पनोरा विद्यालय पनोरा येथे दि. 10,11 डिसेंबरला स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस पार पडणाऱ्या या स्नेह संमेलन कार्यक्रमात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्होली, रेणुका माता विद्यालय, वासनी बु् या संस्थेअंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक तथा शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव कोरपे अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था नालवाडा तसेच उद्घाटक म्हणून सौ.शोभाताई सु. टोळे सरपंच ग्रामपंचायत पनोरा उपस्थित आहेत. ‘मी पाहिलेले ‘ साबळे साहेब ,या विषयावर संजय धाबे मुख्याध्यापक राधाकृष्णन विद्यालय सावळापूर यांचे व्याख्यान राहणार आहे.
11 डिसेंबर सकाळी दहा वाजता सुखदेवराव काळे सहसचिव श्री.संत गाडगेबाबा शिक्षण संस्था नालवाडा हे अध्यक्ष म्हणून तर उद्घाटक म्हणून सौ.नीलिमाताई टाके शिक्षण उपसंचालक अमरावती त्याचबरोबर सौ.संगिताताई शिंदे अध्यक्ष शिक्षण संघर्ष समिती उपस्थित राहणार आहेत.
चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.असे गजेंद्र गावंडे मुख्याध्यापक पनोरा विद्यालय पनोरा सौ.मनिषा गावंडे मुख्याध्यापिका माध्यमिक विद्यालय कान्होली,दिपक गावंडे मुख्याध्यापक रेणुका माता विद्यालय वासनी बु्.तथा तिन्ही शाळेतील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित राहणार आहे.


