Home Maharashtra पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता आणि त्यांची कर्तव्ये!.. — मौजा महादवाडी...

पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता आणि त्यांची कर्तव्ये!.. — मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून चार महिने वंचित केले म्हणजे त्यांच्या मुलभूत हक्कांवर वार केलाय असे होय. — स्वच्छ पाणी आणि त्याचे महत्व,”सरपंच भोजराज कामडी यांनी उपविभागीय अभियंता पोटुडे,कनिष्ठ अभियंता व उपठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी काय? — भाग – ०२….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

        पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता म्हणजे पाणीपुरवठा व्यवस्थेच्या एका विशिष्ट उपविभागाचे (उदा. जिल्हा परिषद,नगरपालिका किंवा ग्रामीण पाणीपुरवठा) नियोजन,अंमलबजावणी आणि देखरेखीची जबाबदारी असलेला अभियंता.

          जो पाणीपुरवठा योजना आणि जलव्यवस्थापनाच्या कामांमध्ये कार्यकारी आणि तांत्रिक भूमिका बजावतो,जसे की नवीन कनेक्शन देणे,दुरुस्ती करणे आणि पाणी वितरण व्यवस्था पाहणे हे त्यांचे प्रामुख्याने कर्तव्य आहे. 

          मात्र,चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी येथील पुरुष-महिलांना भर पावसाळ्यात स्वच्छ पाण्यापासून वंचित करण्याचे काम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी केल्याचे वास्तविक प्रकरण समोर आहे.

           उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून वंचितच केले नाही तर त्या गावचे सरपंच भोजराज कामडी यांच्यासोबत ते लेखी पत्र देऊन सुद्धा चक्क खोटे बोलले.

        याचबरोबर मौजा महादवाडी येथील पुरुष-महिलांना आणि सरपंच भोजराज कामडी यांना आपल्या अयोग्य कृतीद्वारे संतापजनक मनस्ताप दिलाय..

          भर पावसाळ्यात मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी सरपंच भोजराज कामडी हे जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर येथे वारंवार पायपीट करीत होते.

           परंतु मौजा महादवाडी येथे जल जीवन मिशन योजना अंतर्गत चुकीच्या कार्यपद्धती नुसार काम केले व संबंधित उपविभागीय अभियंता,कनिष्ठ अभियंता,उपठेकेदार पवन बंडे,यांनी तेथील पुरुष-महिलांना सतत चार महिने अस्वच्छ पाणी पाजले.

          सरपंच भोजराज कामडी यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संघर्ष केला.पण,जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरच्या उपविभागीय अभियंत्यांना,कनिष्ठ अभियंत्यांना व ठेकदारांना मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे जमले नाही.

             सरपंच भोजराज कामडी यांना मौजा महादवाडी येथे,”आरो प्लाॅन्ट बसविण्यासंबंधाने,”लेखी पत्र देऊनही उपविभागीय अभियंता पोटुडे यांना स्वतःच्या लेखी पत्राचे विस्मरण झाले आणि त्यांनी मौजा महादवाडी येथे आरो प्लाॅन्ट बसवून देण्याऐवजी,सरपंच भोजराज कामडी यांना घुमविणे सुरू केले.

            एका सरपंच सारख्या लोकप्रतिनिधींला आरो प्लाॅन्ट बसविण्यासंबंधाने लेखी दिल्यानंतरही,त्यांना वारंवार घुमवणे हा जि.प.उपविभागीय अभियंता पोटुडे यांचा गंभीर प्रकार सरपंच भोजराज कामडी यांची दिशाभूल करणारा व विश्वासघात करणारा होता हे आवर्जून म्हणावे लागेल.

             ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी मुलभूत मुख्य कार्ये आणि जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या आहेत.

            यामुळे जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण,डिझाइन आणि अंमलबजावणी करणे व यानुसार नवीन पाणी जोडण्या मंजूर करणे आणि त्यांचे वितरण करणे,देखरेख करणे,जलवाहिन्या आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे,कनिष्ठ अभियंत्यांना मार्गदर्शन करणे आणि पाणीपुरवठा संबंधित तांत्रिक समस्या सोडवणे हे उपविभागीय अभियंता यांची जबाबदारी आहे.तद्वतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना (कार्यकारी अभियंता,अधीक्षक अभियंता) कामाचा अहवाल देणे त्यांना बंधनकारक आहे.

         उपविभागीय अभियंता हे पद पाणीपुरवठा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

         उपविभागीय अभियंता (पाणीपुरवठा विभाग) हे पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी,देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेले एक महत्त्वाचे पद आहे,जे सामान्यतः जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Jal Jeevan Mission सारख्या योजनांसाठी) अंतर्गत कार्यरत असते.ज्यांचे मुख्य कार्य पाणीपुरवठा संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय काम पाहणे, तसेच पाणीपुरवठा समस्या सोडवणे हे असते.

            ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर देखरेख ठेवणे आणि त्या वेळेत पूर्ण करणे.जलवाहिन्या,विहिरी आणि पंपांची देखभाल व दुरुस्ती करणे.कनिष्ठ अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे.

            पाणीपुरवठा संबंधित माहिती गोळा करणे.ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे,पाणीटंचाईच्या काळात किंवा इतर समस्यांवर उपाययोजना करणे आणि ग्रामस्थांना मदत करणे हे सुद्धा उपविभागीय अभियंता यांचे काम आहे.

            ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हणजे ग्रामीण भागातील घरांना सुरक्षित,पुरेसे आणि शाश्वत पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी काम करणारा सरकारी विभाग,जो प्रामुख्याने जल जीवन मिशन (JJM) सारख्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करतो,तसेच जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाची कामे करतो. 

            महाराष्ट्र शासनांतर्गत,जिल्हा परिषदेच्या स्तरावर हे विभाग काम करतात आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध योजना राबवतात,जसे की नवीन पाणीपुरवठा योजना,विहिरींची दुरुस्ती,आणि टंचाईकाळात उपाययोजना करणे.

         म्हणूनच जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता यांना खेडे गावाची जलवाहिनी म्हटल्या जाते.

मुख्य कार्ये….

         जल जीवन मिशन (JJM) ची अंमलबजावणी करताना प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे पाणी देणे.पाणीपुरवठा योजना राबवणे,नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे,त्यांची अंमलबजावणी करणे.पावसाचे पाणी साठवणे आणि भूजल पातळी वाढवणे.अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती करणे,या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

          म्हणून,ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा सुनिश्चित करणे हे प्रामुख्याने राज्य सरकारांचे कर्तव्य आहे.याचबरोबर राज्य सरकारांना ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्पांचे नियोजन,मंजुरी,आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत.

स्वच्छ पाणी आणि त्याचे महत्व…..

           स्वच्छ पाणी पिण्याचे 5 फायदे म्हणजे सामान्य रक्तदाब ठेवणे,इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे,शरीराचे तापमान बरोबर ठेवणे,बद्धकोष्ठता रोखणे आणि मेंदू सुधारणे.पाणी हे जीवन आहे,कारण ते पिण्यासाठी,स्वयंपाक करण्यासाठी,स्वच्छता राखण्यासाठी,शेती आणि उद्योगांसाठी आवश्यक आहे.

        स्वच्छ पाणी शरीरातील तापमान नियंत्रित ठेवते,शरिरात पोषक तत्वे पोहोचविते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे यासारख्या अनेक शारीरिक क्रियांसाठी ते महत्त्वाचे आहे आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मूलभूत आहे. 

कारवाई करावी काय?…..

            अयोग्य कामातंर्गत जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय चिमूरच्या उपविभागीय अभियंताकडून मौजा महादवाडी येथील नागरिकांना चार महिने स्वच्छ पाण्यापासून वंचित करण्याचे काम करण्यात आले व गढूळ पाणी पिण्यासाठी मजबूर करण्यात आले.मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्यासारखा मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले.

        यामुळे सरपंच भोजराज कामडी यांनी संबंधित उपविभागीय अभियंता,कनिष्ठ अभियंता,उपठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी काय?