Home Social शंकरपूर येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे...

शंकरपूर येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

 दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी शंकरपूर येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले.

        श्री.संताजी शोभायात्रा मित्र मंडळ, शंकरपूर यांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेला गावकऱ्यांकडून अतुलनीय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

        शोभायात्रेची सुरुवात संताजी वार्ड क्र. ५ येथून करण्यात आली. डी.जे.च्या भक्तिगीतांच्या सुरावटी, आकर्षक पताका, मनोहारी रांगोळ्या तसेच संत परंपरेचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक घटक यांच्या सहवासात शोभायात्रा भव्यतेने पुढे सरकत राहिली.

         शोभायात्रेचा समारोप संताजी जगनाडे महाराज देवस्थान, चिमूर रोड, शंकरपूर येथे मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना आलू भाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच समाजातील शेंडे व कोलते परिवारातील दोन लहान मुलांचे वाढदिवस साजरे करून कार्यक्रमाला आनंदाचा आणि सद्भावनेचा अनोखा स्पर्श देण्यात आला.

         या शोभायात्रेत महिला, युवक, वयोवृद्ध, विद्यार्थी तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संतांनी दिलेला ऐक्य, भक्तीभाव व समाजसेवेचा संदेश प्रत्यक्षात साकारला.

         कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संताजी शोभायात्रा मित्र मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, गावकरी व उपस्थित सर्व भाविकांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. शोभायात्रा शांततेत, शिस्तीत व भक्तिभावाने पार पाडत शंकरपूरवासीयांनी संत परंपरेचा गौरवशाली वारसा जपला.

श्री. संताजी शोभायात्रा मित्र मंडळ, शंकरपूर तसेच

श्री अशोक ज्ञानेश्वर चौधरी

अध्यक्ष – श्री. संताजी तेली समाज शंकरपूर

उपसरपंच – ग्रामपंचायत शंकरपूर

यांच्यावतीने सर्व उपस्थित भाविक, मान्यवर व गावकरी यांचे मनःपूर्वक आभार.