Home उपक्रम ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ…

ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व बालक मंदिरात क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. माऊलींची पुजा, दीपप्रज्वलन व क्रीडा ज्योत प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

         यावेळी ह.भ.प. रंगनाथ देशमुख, भगवान साकोरे, भाग्येश बागमार, सौरभ गव्हाणे, संस्था सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धावणे, लंगडी, पोत्याची शर्यत अशा स्पर्धांना प्रारंभ झाला.

          विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा महत्त्वाची असून खेळातून शिस्त, आरोग्य व कौशल्य विकसित होते, असे सचिव अजित वडगांवकर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. पसायदानाने समारोप झाला.