आज मितिस पृथ्वीतलावर अडीशे ते तीनशे देश आहेत. हिंदू मुस्लिम शिक एसाई येहुदी जैन अशी कितीतरी धर्म आहेत. याचा अर्थ हे जग अनेक देशांनी आणि अनेक धर्म आणि व्यापलेले आहे. म्हणून हे सारे विश्व धर्माचे आणि धर्माच्या बंधनात अडकलेले तसेच हे विश्व अनेक देशांचे आणि देशांच्या सीमा मध्ये अडकून बसलेले म्हणजे बंदिस्त आहे. हे सारे विश्व जातीच्या धर्माच्या आणि देशांच्या बंधनात आहे, याचा अर्थ हे विश्व बंधमुक्त नाही. या विश्वाला स्वातंत्र्य नाही. या विश्वातील माणसाला स्वातंत्र्य नाही. हे सारे विश्व आणि या विश्वातील सारी माणसे देशांच्या आणि धर्मांच्या अधीन आहेत.
पराधीन आहेत, म्हणून एका कवीने म्हटले आहे की,”पराधीन आहे जगती विश्व माणसांचा “. या विश्वातील माणूस हा या जगात जन्म घेताना सोबत कोणती जात, कोणता धर्म, कोणता देश सोबत घेऊन आला नाही, किंवा त्याने तसे ठरवून या जगात प्रवेश केला नाही, कारण ते त्याच्या हातात नाही, मात्र माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा तो ज्या देशात जन्माला येतो त्या देशाचे नाव तसेच ज्या धर्मात जन्माला येतो त्या धर्मा चे नाव त्याच्या कपाळावर कोरल्या जाते आणि त्यावर त्या देशाची देशभक्ती आणि त्या धर्माची धर्म भक्ती त्याच्या माती मारल्या जाते, त्याच्या गळी उतरविल्या जाते, माझा देश आणि माझा धर्म म्हणजेच माझा स्वाभिमान अभिमान अशा अहंकाराचे संस्कार जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसावर केल्या जातात, असे हे संस्कार समतेचे नसतात तर विषमतेचे असतात, देशभक्ती आणि धर्माभिमान या दोन गोष्टीचे संस्कार माणसाला माणसापासून दूर करणारे असतात नव्हे आहेत. कारण या विश्वाची निर्मिती झाली, इथे निसर्ग निर्माण झाला, या निसर्गात निर्जीव आणि सजीव सृष्टी निर्माण झाली तेव्हा यावर कोणाचीही मालकी नव्हती, या सृष्टीवर म्हणजे या पृथ्वीवर म्हणजे या जगात प्रारंभी कुण्या एका व्यक्तीची किंवा एका राजाची किंवा एका देशाची, एका धर्माची मालकी नव्हती, हे जग कुण्या एका देशाच्या किंवा धर्माच्या ताब्यात नव्हते, कारण पूर्वी म्हणजे प्रारंभी देश राष्ट्र जात धर्म या गोष्टीच अस्तित्वात नव्हत्या, कारण या गोष्टी निसर्गनिर्मित नसून या मानवनिर्मित आहेत.
तेव्हा या विश्वात वनस्पती पक्षी पशु आणि मानव निर्माण झाले. सजीवात मानव हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे त्यांनी बुद्धीचा गैरवापर केला. माणसात सुबुद्धी आणि दुर्बुद्धी असे दोन बुद्धी असतात, या जगातील सर्व माणसांची विभागणी केली तर त्याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे सुबुद्धीची माणसे आणि दुसरे म्हणजे दुष्ट बुद्धीची माणसे म्हणजे कु बुद्धी ची माणसे. त्यातील सुबुद्धीची माणसे ही साधी सरळ मोकळ्या मनाचे असतात, सर्वांचे हित व्हावे असे विचार करणारी असतात किंवा कुण्याच भानगडीत न पडता आपल्या आपण कामधंदा करून पोट भरावे असे विचाराचे असतात. परंतु दुर्बुद्धीची माणसे मात्र असा विचार न करता ते वाईट विचार करतात कारण वाकड्या बुद्धीच्या माणसांना वाकडेच सुचत असते. कु बुद्धीची म्हणजे दुष्ट बुद्धीची म्हणजे इतरांचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असा विचार करणारी माणसे ही स्वार्थी असतात त्यांना मोह तृष्णा आशा आकांक्षा अति असतात त्यामुळे ते सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या शोधात असतात त्याच्या मागे लागतात त्यासाठी अनेक शक्तींचा आणि युक्त्यांचा वापर करतात आणि आपले जीवन सुखी आणि ऐशरामी कसे करता येईल, याचाच ते सतत विचार करीत असतात. असे लोक विकृत बुद्धीचे असतात, यांच्यात अहंकार राग लोभ मोह मान माया द्वेष मत्सर हे सारे माणसाचे शत्रू यांचा अशा लोकांत वावर असतो, म्हणून असे लोक स्वतःचाच जास्त विचार करतात आणि इतरांचा अजिबात विचार करत नाहीत. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, याची खंत त्यांना अजिबात नसते, उलट इतरांना कसा त्रास द्यायचा, त्यांचेवर कसा अन्याय अत्याचार करायचा, त्यांची आर्थिक मिरवणूक कशी करायची, त्यांना जाती-धर्माच्या नावाने कसे झुंजत ठेवायचे ? याचाच ते सतत विचार करीत असतात. कारण हे मूळतःच दुर्गुणी असतात. सद्गुनी माणसे मात्र या भानगडीत पडत नाहीत. कारण ते सरळ मार्गे असतात. वाकड्या मार्गाचा ते अवलंब करत नाहीत कारण त्यांना ते योग्य वाटत नाही, आपले आपण काम करावे पोट भरावे संसार थाटावा असा विचार करतात, आणि या सद्गुनी माणसातील काही विशेष गुण असलेले लोक मात्र ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा ‘असा विचार करून ते लोकांच्या कामे येतात.
आज सारे विश्व हे पारंपारिक अनेक धर्मांनी व्यापलेले असले तरी या पृथ्वीवर हे कोणतेच धर्म अस्तित्वात नव्हते, कोणतेच देश अस्तित्वात नव्हते. हे जग ही पृथ्वी साऱ्यांचीच होती, वनस्पती पक्षी प्राणी मानव या सर्वांचीच होती, म्हणजेच या सर्वांचाच अधिकार हक्क या विश्वावर होता आणि अजूनही आहे, परंतु तो हा सर्वांचा हक्क आणि अधिकार काही स्वार्थी माणसांकडून हिरावून घेतला गेलेला आहे. तो परत मिळविणे ही काळाची गरज आहे.
संतांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी या विश्वाला या जगालाच आपले घर समजले, या घरातील सर्व माणसे म्हणजे आपले कुटुंब आहे असे समजले, म्हणून “विश्वची हे माझे घर ” असा नारा दिला, हा नारा अमलात आणण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्नही केला, तरीपण त्यांचेच भक्त त्यांनाच म्हणजे त्यांच्या विचारांनाच मानत नाहीत, त्यांच्या विचारांची पूजा न करता म्हणजे त्यांच्या विचारांची अंमलबजावणी न करता फक्त त्यांना देव करून त्यांची पूजा पालखी करीत बसले. तुकाराम महाराजांनी पण भेदाभेद वर्ण अमंगळ असे सांगितले तरीही त्यांच्या भक्तांच्या डोक्यात देशील नाही, याचा अर्थ एवढी त्यांची कमकुवत बुद्धी आहे असेच म्हणावे लागेल. आणि कमी बुद्धीचे लोक काही परिवर्तन घडवितील अशी अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. जोपर्यंत बुद्धीत फरक होत नाही म्हणजे जोपर्यंत विचार बदलत नाहीत तोपर्यंत माणूस बदलत नाही, समाज बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही, आणि व्यवस्था ही बदलत नाही. म्हणून विचार बदलणे हे फार महत्त्वाचे आहे. विनोबा भावेंनी ‘ जय जगत ‘चा नारा दिला, जय जगत याचा अर्थ तोच आहे जो ज्ञानेश्वराने सांगितला. हे सारे विश्व माझे आहे आणि मी ह्या विश्वाचा आहे, माझा देश या विश्वापासून स्वतंत्र आहे अलग आहे असे मानणे म्हणजेच संकुचित पणा होय संकुचित विचार समजावे. संतांनी महामानवाने संकुचित न विचार करता व्यापक विचार करण्यास सांगितले, एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे बंधू भावाने, समतेच्या भावाने पहावे. शत्रुत्व भावाने किंवा संशय वृत्तीने एकमेकाकडे बघू नये किंवा तसा व्यवहार करू नये, इथून तिथून या पृथ्वीवरील सर्व माणसे ही माणसेच आहेत ती जनावरे नाहीत असे समजून एकमेकांनी बंधुप्रेम बंदुत्व आणि समत्व विकसित करणे हे साऱ्या मानव जातीच्या कल्याणाचे आहे, यातच अखिल मानव जातीचे संरक्षण दडलेले आहे, याच विचारात शांतता सुव्यवस्था स्थिरता आहे.
वर्तमान स्थितीत आज अनेक धर्मांची गरज नाही तर हे सारे धर्म विसर्जित करून केवळ ‘ मानवता धर्म , सर्वांनी पाळण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, कारण जातीच्या धर्माच्या आणि देशाच्या नावाने प्रचंड हिंसाचार सुरू झालेला आहे, दरवर्षी या नावाने लाखो लोकांची कत्तल केल्या जात आहे, यावरून असे दिसते की जात धर्म आणि देश हे माणसे मारण्याचा माणसांची कत्तल करण्याचा कारखानाच बनलेले आहेत. ज्याला कत्तलखाना असे म्हणतात.
हजारो वर्षापासून माणूस सुधारण्यासाठी म्हणून अनेक धर्म झाले परंतु माणसे काही सुधारले नाहीत, त्यांच्यातील नेतिमत्ता अधिक दृढ होण्याऐवजी अधिक बिघडतच गेली, इथपर्यंत की, धर्माच्या नावाने एकमेकांच्या कत्तली करणे सुरू झाले. प्रत्यक्षात असे घडत असेल तर, मग गीता पुराण बायबल किंवा प्रत्येक धर्माचे अनेक ग्रंथ पुराण किती चांगले असले आणि त्यात त्याचे परिणाम जर चांगले नसतील तर मग त्यांचा उपयोग काय ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. आणि ज्या गोष्टीचा माणसाला उपयोगीच काही नाही किंवा त्याचा दुरुपयोग होत असेल किंवा त्याचे दुष्परिणाम होत असतील तर असे धर्म आणि धर्माचे ग्रंथ यांना बाजूला गुंडाळून ठेवले पाहिजे. हल्ली बौद्ध धर्म सुद्धा कर्मकांडात गुंतून जात आहे आणि या देशातील विषमता मग ती आर्थिक असेल की सामाजिक विषमता दूर करण्यास असफल झालेला आहे असेच हे वर्तमान आहे. याचा अर्थ सर्वच धर्म हे आज मीतिस समता आणि बंधुता आणि न्याय देण्यास समर्थ आहेत म्हणून त्यांचा त्याग करणे ही काळाची गरज ठरलेली आहे. म्हणून सर्व जाती धर्म आणि देश यांच्या मर्यादा संपविल्या पाहिजेत आणि सर्व जग एक झाले पाहिजे, आपण सर्व माणसे विश्वचिये माझे घर असे समजून विश्व कुटुंबाचे सदस्य झाले पाहिजे. आणि मानवता धर्म हा साऱ्यांनीच अंगीकारला पाहिजे. यालाच खरे धर्माचे स्वातंत्र्य असे म्हणतात. धर्माचे स्वातंत्र्य याचा अर्थ ज्याला जो धर्म स्थापन करायचा आहे तो करावा आणि इतरांचा द्वेष मत्सर करावा, भांडणे मारामाऱ्या कराव्यात यासाठी नाही, हे खरे जरी असले तरी पण व्यवहारात काय घडते आहे हे आपण सारेजण पाहतो आहोत, वर्तमानाचे आपण साक्षीदार आहोत, धर्माचे आणि जातीचे आणि देशाचे वर्तन आणि त्या वर्तनाचे आपण सारे बळी झालेलो आहोत. आपल्या मुलाबाळांचे भवितव्यपण धोक्यात आलेले आहे. म्हणून जाती तोडा आणि नाती जोडा तसेच धर्म सोडा आणि माणूस जोडा, हा नारा आपण सगळ्यांनी मान्य केला तर आज जातीच्या धर्माच्या आणि देशाच्या नावाने जी भयानक मनुष्यहानी होत आहे, भौतिक विकासाला पण अडसर निर्माण होत आहे, या दुष्परिणामापासून आपण मुक्त होणार आहोत आणि शांतीमय सुरक्षित जीवन जगणारा आहोत, हे समजून घेण्याची गरज आहे.
आज सारे जग हे धर्माचे झालेले आहे असे नव्हता विश्वाचा धर्म काय आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विश्वाचा धर्म म्हणजे विश्वातील जीवसृष्टी आणि जडसृष्टी याचे संरक्षण करणे त्यांना सुरक्षिततेची हमी देणे, त्यांचे जीवन शांततामय होणे हाच विश्वाचा धर्म आहे. जो धर्म या पृथ्वीतलावरील स्वार्थी लोकांनी नष्ट केला आहे. आणि आपल्या स्वार्थाला उपयोगी होईल अशा प्रकार चा देव धर्म जात पंथ निर्माण केले आहेत. ज्यात माणसाचे स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव हिरावून घेण्यात आलेला आहे, ज्या धर्मात स्वातंत्र्य नाही समता नाही न्याय नाही बंधू भाऊ नाही असे धर्म मानव जातीस हानिकारक आहेत. हे धर्म माणसाला माणसाला बंदिस्त करतात, समाजापासून अलग करतात, एकसंघ समाजाचे अनेक गटात रूपांतर करतात. अखंड देशाचे तुकडे तुकडे करतात, असे धर्म माणसाचे काहीच करणार आहेत ?
म्हणून विश्व हे संकुचित पारंपारिक असलेले जे अनेक धर्म आहेत त्यांचे न होता विश्व हे व्यापक धर्माचे म्हणजे मानवतेच्या धर्माचे बनले पाहिजे. म्हणजेच विश्व हे धर्मांचे न राहता, विश्वाचा धर्म जो आहे त्या धर्माचे बनले पाहिजे. विश्वाचा धर्म म्हणजेच ‘. वसुधैव कुटुम्बकम, विश्वचिये माझे घर, जय जगत, भेदभाव विरहित माणूस ‘.



