दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – “ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ही आळंदीकरांची अभिमानाची शैक्षणिक परंपरा असून तिच्या उभारणीत इथल्या मातीतल्या प्रत्येक कुटुंबाचे श्रम, त्याग आणि प्रेम गुंतलेले आहे,” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी केले.
ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नव्या विश्वस्त मंडळाचा सन्मान ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी हभप वासुदेव शेवाळे, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार दिपक पाटील तसेच संस्थेचे नवीन विश्वस्त मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश वडगावकर म्हणाले, “ही संस्था फक्त शिक्षणाची नाही तर संस्कारांची घडण घडवणारे पवित्र केंद्र आहे. आळंदीकरांनी नेहमीच मागे न पाहता संस्थेला साथ दिली. या योगदानाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.”
आळंदीतील शैक्षणिक क्षेत्रात अधिक सक्षम सुविधा, तंत्रशिक्षणाचा विस्तार, क्रीडा – सांस्कृतिक उपक्रमांना चालना, तसेच गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला संस्थेची विकासाची वाटचाल अधिक वेगाने करण्याचा निर्धार नवनिर्वाचित विश्वस्तांनी व्यक्त केला.



