Home Social नेरी येथील दिपंकर बुद्धविहारात राष्ट्र निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

नेरी येथील दिपंकर बुद्धविहारात राष्ट्र निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..

      चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील दिपंकरबुध्द विहारात विश्वभुषण,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वान दिनानिमित्त,विनंम्रपणे अभिवादन करण्यात आले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्दपंच कमेटीचे अध्यक्ष विनोद पेटकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय घुटके,पोपटे सर,संजय वाघमारे,सचीन नगराळे,माणिक नगराळे,महिला अध्यक्षा गिता जगताप,कल्याण पोपटे,युवक अध्यक्ष,विक्की पोपटे प्रामुख्याने उपस्थित होते.

            उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला व ते भारतासह जगातील नागरिकांचे कसे प्रेरणास्थान आहेत याची माहिती उपस्थितांना दिली.

          युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका आवर्जून उपस्थित होते…