युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
संविधान मध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, राज्याची कार्यकारी रचना इत्यादी विषय अनेक कलमे आहेत त्यापैकी एक कलम आरक्षणाचे आहे. त्यामुळे संविधान म्हणजे आरक्षण होत नाही असे प्रतिपादन सुरज मंडे यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा शिक्रा येथिल “संविधान दिनाचे निमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून दिपक धांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादनाने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सुबोध योगिराज टेंभरे या विद्यार्थ्याने संविधान विषयी विद्यार्थ्यांना अवगत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज जुनघरे यांनी केले.
कार्यक्रमाला दिशा जितेंद्र जुनघरे, शकील बानो, रेखा मारुती तामगाडगे, अश्विनी मेश्राम, राजेश मेश्राम, वसंतराव टेंभरे, सौरभ टेंभरे, दुर्गा पद्माकर खंबरे, धनश्री किशोर गरड, सार्थक प्रदिप चौधरी, विहान अनिल मारबदे, समर्थ अमोल पडोळे, पियूष सचिन शेंडे, विराज दशरथ मारबदे, प्रज्वल सचिन पाटील, अथर्व राहुल पडोळे, पलक रामपाल बद्रे, देविका दीपक शिखरे, संविधान संतोष कांबळे, आरव नंदकिशोर मालगावे, वेदांत किशोर गरड, सानवि प्रफुल कांबळे, तन्वी निलेश मालगावे, दिव्यांनी विनोद टेंभरे, रीता नीलेश मालगावे, कृष्णा अंकुश शेंडे, नमन हिंमत मालगावे, गौरव सचिन शेंडे,यांचेसह परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



