बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील मनीषाताई आण्णासो मगर यांची इंदापूर तालुका महीला वारकरी परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आळंदी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा या ठिकाणी ह भ प भाऊसाहेब हांडे व महिला जिल्हा आध्यक्षा सविताताई गवते यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याच वेळी इंदापूर तालुक्यामध्ये महिला आघाडीची पद नियुक्ती करण्यात आली.
निवडी प्रसंगी मनीषाताई मगर पुढे म्हणाल्या की मला आपल्या वारकरी साहित्य परिषदेने माझ्यावर दिलेली जबाबदारी त्या जबाबदारीचा योग्य परिपूर्ण उपयोग करून इंदापूर तालुक्यातून महीला वारकरी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहभागी करण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील. मनीषा मगर यांचे नियुक्तीपत्र घेण्या प्रसंगी त्याचे उद्गार,
जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचे वंशज श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांचे इंदापूर तालुक्यात हजाराहून अनेक भजनी मंडळ, मृदुंग वादक, टाळकरी , तबला वादक, विणेकरी, गायक, वारकरी, आणि संप्रदायातील शिष्य तयार झालेले आहेत.
या प्रसंगी हभप भाऊसाहेब हांडे बोलत असताना म्हणाले की,
वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, पालखी सोहळ्यातील पायी चालणारी वारकरी यांच्यासाठी शासन दरबारी ज्या ज्या योजना आहेत त्या त्या मानधनाच्या योजना नियमानुसार वारकऱ्यांना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे महिला हरिपाठ मंडळाची स्थापना करणे वारकरी साहित्याचा प्रचार आणि प्रसार इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, भाऊसाहेब हांडे महाराज यांचे उदगार,
निवडीच्या कार्यक्रमा प्रसंगी, ह भ प भाऊसाहेब हांडे महाराज, ह भ प मिटकर गुरुजी , ह भ प तालुकाध्यक्ष सचिन महाराज मोहिते, ह भ प तालुका ऊपअध्यक्ष महेश सुतार, सुरेश वाळेकर (हवेली प्रसिद्धीप्रमुख), ह भ प. बाळासाहेब आटोळे ( जिल्हा खजिनदार) यांनी मार्गदर्शन केले.
सदर इंदापूर तालुका कार्यकारणी बदल महीला कार्यकरणी सदस्यांची पदनियुक्तीची निवड करण्यात आली.
यामध्ये इंदापूर तालुका महिला अध्यक्षपदी ह भ प मनीषाताई आण्णासो मगर यांचा धार्मिक क्षेत्रामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार व भजन आशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांची
महिला तालुक्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर यावेळी मोठ्या संख्येने कार्य करते, वारकरी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष ह भ प भाऊसाहेब महाराज हांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंदापूर तालुका कार्यकारणीचे उपाध्यक्ष ह भ प महेश महाराज सुतार यांनी मानले सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



