Home Social महात्मा फुले यांचे विचार वर्तमान आणि भविष्यातही गरजेचे :- अनिल स्वामी… ...

महात्मा फुले यांचे विचार वर्तमान आणि भविष्यातही गरजेचे :- अनिल स्वामी… — विश्वशांती विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी…

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाज व्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले स्त्री – शिक्षण,त्यांना समान अधिकार, शेतकऱ्यांची परिस्थिती व शासन व्यवस्था चालविताना घ्यावयाचा धोरणात्मक गोष्टीचे विवेचन केले.

           त्या काळात असलेले अनेक प्रश्न आजही या देशात आहेत त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्य काळातही गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष अनिल स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले.

        भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३५ पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले.

         त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे, ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,किशोर संगीडवार, श्वेता खर्चे,तसेच प्रमुख मार्गदर्शक धनंजय गुरनुले म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर प्रकाश टाकला.

        आयोजित कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी मानले.

         कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी मोलाचे सहकार्य लाभले.