अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- जिल्हा सामान्य रुग्णालयात कानाच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा तसेच त्याच्या ओळखीच्या तरुणाचा खिसा अज्ञात चोरट्याने कापल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी दीपक बाबाराव वानखडे (वय 50), रा. रघुनाथपुरा, ता. तिवसा, जि.अमरावती यांच्या तक्रारीप्रमाणे दि. 26 नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे कानाचे अपंगत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे आले होते.
त्यांच्या जवळ रु. 8,500 नगद होते, जे त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवले होते. फिर्यादी रांगेत उभे होते, तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे जाण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून औषधांची चिठ्ठी दिली. त्यानंतर फिर्यादी औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले. तेव्हा त्यांनी खिशात पाहिले असता रु. 8,500 गायब असल्याचे दिसून आले.
फिर्यादीने रुग्णालय परिसरात व आजूबाजूला शोध घेतला, चौकशी केली; परंतु पैसे मिळाले नाहीत. रुग्णालयात रांगेत उभे असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून रोख रक्कम चोरल्याचे उघड झाले.
दुसऱ्या व्यक्तीचाही खिसा कापला…
घटनेदरम्यान त्यांच्या गावातील ओळखीत असलेले अमोल रामदास मुदरे (वय 37), रा. रघुनाथपुरा, अमरावती यांच्याही पॉकेटची अज्ञात चोराने चोरी केली.
चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये फिर्यादीच्या आईचे आधारकार्ड, एटीएम कार्ड, लायसन्स, पॅन कार्ड,नगदी ₹250 असा एकूण ₹८७५० चा ऐवज चोरीस गेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी
कलम 303(2) बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
