Home शैक्षणिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवजीवन कॉन्व्हेंटचा उत्कृष्ट ठसा – द्वितीय क्रमांक पटकावला..

प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवजीवन कॉन्व्हेंटचा उत्कृष्ट ठसा – द्वितीय क्रमांक पटकावला..

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

         जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत *नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल सीबीएसई साकोली ने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक* मिळवला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील *अनेक नामांकित शाळांनी सहभाग* घेतला होता. सर्व स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

          स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विविध विषयांवर आपले उत्तम आकलन आणि तत्परता सादर केली. नवजीवन कॉन्व्हेंटच्या टीमने शांत, आत्मविश्वासी आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक फेरीत मजबूत कामगिरी केली.

         शेवटच्या निर्णायक फेरीत कठीण प्रश्नांना योग्य उत्तरे देत विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली आणि द्वितीय क्रमांक मिळवत शाळेचा मान उंचावला. स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं पुनश्च प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

           शाळेचे संस्थापक, प्राचार्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दाखवलेली तत्परता, मेहनत आणि टीमस्पिरिट अभिमानास्पद आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड वाढते आणि स्व-विश्वास बळकट होतो.”

            नवजीवन कॉन्व्हेंटच्या या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.