Home Social नगरसेवक युनुसभाई शेख यांच्या पुढाकाराने संविधान दिन साजरा… — ‘संविधान उद्देशिका’चे...

नगरसेवक युनुसभाई शेख यांच्या पुढाकाराने संविधान दिन साजरा… — ‘संविधान उद्देशिका’चे वाटप करून लोकशाही मूल्यांबाबत जागृती…

    अमान कुरेशी

 जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

       दखल न्युज भारत

सिंदेवाही, दि. 26 नोव्हेंबर 2025 : भारताच्या संविधान दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक युनुसभाई शेख, अध्यक्ष – निराश्रीत-नीराधार लोकसेवा प्रकल्प, यांच्या पुढाकाराने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

          या निमित्ताने तहसील कार्यालयातील अर्जुनवीस सभागृहात तसेच शहरातील बाजारपेठ परिसरात नागरिकांना ‘संविधान उद्देशिका’ वाटप करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, मान्यवर आणि नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत युनुसभाई शेख यांनी लोकशाहीचे मूलभूत तत्त्व समजून घेण्याचे आवाहन केले.

युनुसभाई शेख म्हणाले,

         “ज्याप्रमाणे मानवाला जगण्यासाठी ‘ऑक्सिजन’ची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जीवनातील मूलभूत मूल्ये समजून घेण्यासाठी संविधान आवश्यक आहे. संविधानातील मूल्ये आत्मसात झाल्यासच लोकशाही सक्षम राहील आणि समाजात समता, बंधुता, न्याय व समानता रुजेल.”

           कार्यक्रमात तहसील कार्यालयातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनुसभाई शेख यांनी संविधान उद्देशिकेचे वाटप करून उपस्थितांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.