अमान कुरेशी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
दखल न्यूज भारत
चंद्रपूर :- जिल्ह्यात अल्पवयीन मुले–मुली बेपत्ता होणे किंवा त्यांच्याशी संबंधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या,“ऑपरेशन शोध–2” मोहिमेला आणखी एक उल्लेखनीय यश मिळाले आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथील अपराध क्रमांक 893/2025,कलम 137(2) भारतीय न्याय संहिता मधील अपहृत 14 वर्षीय अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेलेल्या आरोपीचा परभणी जिल्ह्यातून शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलीस पथकाने तत्पर कारवाई करत बालिकेला सुरक्षितरित्या परत आणून तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक श्री.ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे पोस्टे रामनगर पोलीस निरीक्षक श्री. आसिफ शेख (नेतृत्व), सपोनि श्री.शिवाजी नागवे,पोउपनि कवडू गेडाम श्री.कैलास खोब्रागडे,पोहवा 1453 हेमंत बावणे,पोहवा 1508 अहमद शेख,पोहवा 1321 महेश खोके,मपोअं 1062 ज्योती गायकवाड यांनी केली…



