अमान कुरेशी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
दखल न्यूज भारत
चंद्रपूर :- जिल्ह्यातील अल्पवयीन मुले हरवणे किंवा त्यांच्याशी संबंधित गैरप्रकार टळावेत यासाठी सुरू असलेल्या,“ऑपरेशन शोध–2” या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
रामनगर पोलीस स्टेशनच्या अपराध क्रमांक 918/2025 अंतर्गत हरवलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन बालकाचा केवळ आठ दिवसांत शोध घेण्यात यश मिळाले आहे.
बालकाला नैनीताल (उत्तराखंड) येथून सुरक्षितरित्या शोधून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोस्टे रामनगरचे पोलीस निरीक्षक श्री.आसिफ शेख यांच्या नेतृत्वात सपोनि शिवाजी नागवे,पोहवा 1508 अहमद शेख,पोअं 428 देविदास राठोड,पोअं 282 तिरुपती जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशन टीम यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
जलद व प्रभावी तपासामुळे “ऑपरेशन शोध–2” मोहीम पुन्हा एकदा यशस्वी झाली असून पोलीस दलाच्या तत्परतेचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.



