अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा तालुक्यातील कुही येथील शेतकरी जंगलामध्ये गुरे चराईसाठी करण्यासाठी गेले असता दुपारी चारच्या दरम्यान गुराखी मुंगीलाल सानू शेलुकर वय 65 राहणार कुही तालुका चिखलदरा याच्यावर चार अस्वलिने एका सोबत हल्ला केला असून यामध्ये गुराखी गंभीर जखमी झाला.
त्याला प्राथमिक उपचारासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.त्याच्या अंगाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्याच्या हाताला व पायाला तसेच पोटावर अस्वलिने मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने गुराखी गंभीरित्या जखमी झाला आहे.
त्याच्यावर चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर साहेबलाल धुर्वे ग्रामीण रुग्णालय चुरणे यांनी बोलताना सांगितले.



