अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील खुनाच्या प्रकरणातील तिन महिन्यांपासून फरार आरोपी अक्षय प्रदीप शिंपी (वय ३०) याला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, चेंबूर येथून ताब्यात घेतले आहे.
दिनांक २२/०८/२०२५ रोजी पो.स्टे. बडनेरा हद्दीत तिलक नगर रोडवर अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जिवघेणा हल्ला करून त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पो.स्टे. बडनेरा येथे कलम १०३ (१) भा.न्या.सं. नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. याआधीच या प्रकरणातील ५ आरोपी व ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला गेला होता. मात्र, आरोपी अक्षय शिंपी तिन महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शाखेचे पथक सतत त्याचा मागोवा घेत होते आणि त्याबाबत गोपनीय माहिती गोळा करत होते.
२२/११/२०२५ रोजी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर आरोपी अक्षय शिंपी मुंबईच्या चेंबूर परिसरात असल्याचे कळाले. यावरून पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी सपोनि महेश इंगोले आणि पथकास मुंबई रवाना केले. पथकाने तिथून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले आणि आज त्याला पुढील तपासासाठी पो.स्टे. बडनेराच्या ताब्यात सुपूर्द केले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय व गुन्हे श्री रमेश धुमाळ, श्री शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोलीस अंमलदार गजानन ढेवले, मंगेश परिमल, मनोज ठोसर, आस्तीक देशमुख, संग्राम भोजने, योगेश पवार, संदीप खंडारे, प्रभात पोकळे यांनी केली आहे.

