Home Crime ब्राम्हणवाडा थडी पोलिसांमुळे ११ गोवंशांना जीवनदान… — बोलेरो पिकअप जप्त; आरोपी...

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांमुळे ११ गोवंशांना जीवनदान… — बोलेरो पिकअप जप्त; आरोपी फरार…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

          दखल न्युज भारत

 अमरावती :- ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अवैध कत्तलीसाठी वाहतूक केली जाणारी ११ गौवंश जातीची जनावरे आणि बोलेरो पिकअप सह एकूण ₹७.२९ चा ऐवज जप्त करत ११ गोवंशांना जीवनदान दिले. ही कारवाई गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीवर करण्यात आली. 

        पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर रेडवा रोड, ग्राम रेडवा येथे सापळा लावून महींद्रा ॲन्ड महींद्रा कंपनीची पांढरी बोलेरो पिकअप (एफ व्ही -एम एस 1.3T, एमएच 48 बीएम 1989) थांबवली. वाहनामध्ये ११ गौवंश जातीची जनावरे वाहतूक केली जात असल्याचे आढळले. यात ९ गायी, १ बैल आणि १ गोरा यांचा समावेश होता. या जनावरांची किंमत १,७९,०००/- रुपये असून बोलेरो पिकअप वाहनाची किंमत ५,५०,०००/- रुपये आहे, एकूण जप्त मालमत्तेची किंमत ७,२९,०००/- रुपये आहे. 

        सदर प्रकरणी वाहनाचा चालक फरार आहे आणि त्याच्यावर अपक ५००/२५, कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ आणि ११(१) (ड), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         पोलीस अधिक्षक, श्री. विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. शुभम कुमार, उपविभाग अचलपुर, पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. प्रशांत जाधव, पोहेकॉ. शेषराव कोकरे, पोहेकॉ. राजू मरस्कोले, पोशि. अनुप मानकर, चालक पोशि. दिलीप उईके व पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी पोलीस वैष्णवी खेतकर यांनी केली. ‎