Home Social भारतीय संविधान दिनानिमित्त लातूर (जिल्हा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.. — संविधान...

भारतीय संविधान दिनानिमित्त लातूर (जिल्हा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.. — संविधान सन्मान व 500 फूट तिरंगा रॅली,जाहीर व्याख्यान,गायन कार्यक्रमांचा समावेश… — दोन सत्रात होणार कार्यक्रम…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

       स्थानिक लातूर जिल्हा स्थळी संविधान सन्मान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संविधान सन्मान,५०० फुट तिरंगा रॅली,जाहीर व्याख्यान व प्रबोधानात्मक गायन कार्यक्रमांचा समावेश आहे.

        बुधवार दि.26 नोव्हेंबर 2025 ला पहिले सत्र होणार असून यामध्ये 500 फूट लांब तिरंगा रॅली सकाळी ठीक १०:०० वाजता निघणार आहे.

 मिरवणुकीचा मार्ग..‌‌.

        ५०० फुट तिरंगा रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून प्रारंभ होणार आहे व अशोक हॉटेल,छ.शिवाजी महाराज चौक,दयानंद गेट,संविधान चौक,असे मार्गक्रमण करीत तिरंगा रॅलीचा बार्शी रोड,लातूर येथे समारोप होणार आहे.

सायंकाळचे दुसरे सत्र..‌.

         जाहीर व्याख्यान सायंकाळी ठीक ०५:३० वाजता संविधान चौक,बार्शी रोड,लातूर येथे होणार आहे.

    प्रमुख मार्गदर्शक भिक्खू पय्यानंद थेरो असणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.अनंत राऊत (प्रख्यात संविधान व्याख्याते,नांदेड) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत ‌

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे (जेष्ठ विचारवंत, लातूर) हे भुषवणार आहेत.

          व्याख्यान कार्यक्रम नंतर लागलीच सुशील सूर्यवंशी प्रस्तुत बुद्ध व भीम गीतांचा भीमपर्व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.

      कार्यक्रमाचे आयोजक प्रा.यु.डी. गायकवाड,निलेश बनसोडे,विशाल वाहुळे आहेत.

निमंत्रक.‌‌…

     सर्व कार्यक्रमाचे निमंत्रक संविधान सन्मान समितीचे पदाधिकारी,सदस्य,संविधान चौक,बार्शी रोड,लातूर हे आहेत.