प्राचीन काळातील आणि मध्ययुगीन काळातील लढाया या हुकुमशाहीसाठी हुकूमशाहीच्याच होत्या.कारण एक राजा दुसऱ्या राजावर स्वारी करून त्याचे राज्य जिंकून घ्यायचा आणि तिथे आपले हुकूमशाही प्रस्थापित करायची, असा सिलसिला होता, परंतु आधुनिक काळातील लढाया या स्वदेशी लढाया होत्या, म्हणजे आपल्या देशात आपलेच राज्य असावे, म्हणजे परके यांचे राज्य नसावे, म्हणजेच साम्राज्यवादी राजाच्या विरोधात या लढाया होत्या, इंग्रजाचे या जगात अनेक देशावर राज्य होते, ते एवढे की, असे म्हणतात की त्याच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता, एवढे मोठे त्याचे राज्य होते, एवढी मोठी हुकूमशाही होती, दुसरे जागतिक महायुद्ध पेटले, त्यात सर्व देशांनी स्वदेशीचा लढा पुकारला, त्यात स्वदेशीचा लढा यशस्वी पण झाला, तरीपण यातील काही देशांनी हुकूमशाहीच स्वीकारली तर बऱ्याच देशांनी लोकशाही स्वीकारली.
स्वदेशी स्वातंत्र्याचा लढा हा काही देशात येथील घराणे शाही च्या लोकांनी स्व नेतृत्वावर लोकांच्या बळावर लढला तिथे हुकूमशाही स्थापन केली, आणि या देशात स्वदेशी स्वातंत्र्याची लढाई ही जनतेने संघटित होऊन आपले नेतृत्व निवडून त्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याचा लढा पुकारला, तिथे लोकशाही प्रस्थापित झाली.
भारतात भारतातील जनतेने महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, कॉम्रेड भगतसिंग, समाजवादी लोहिया यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन पक्ष संघटना बांधून स्वदेशी स्वातंत्र्याचा लढा दिला, आणि राजकीय स्वातंत्र्य मिळविले.
आपल्या देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लढाई लढावी लागली, आणि भारतातील सामान्य जनतेने आपली जात आणि धर्म विसरून संघटित होऊन स्वातंत्र्याची लढाई केली आणि ती जिंकली. आणि राजकीय स्वातंत्र्य मिळविले. यासाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवली, कित्येक जण जेलमध्येच सडून मेली, कित्येक फासावर गेले, कित्येकांनी अंगावर गोळ्या घेतल्या, बलिदान केले, तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले,
भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ भारतातील माणसांना नागरिकत्व मिळाले याचा अर्थ लोकशाही प्रस्थापित झाली. लोकशाही म्हणजे राजकीय स्वातंत्र्य असे असले तरी, जोपर्यंत नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक न्याय मिळणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही लोकशाही प्रस्थापित झाली असे म्हणता येणार नाही, जोपर्यंत भारतीयांचे आर्थिक स्वावलंबन होणार नाही, तोपर्यंत हे लोकशाही दुर्बलच राहणार आहे. तसेच जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनणार नाही, गुलामीचे ओझे फेकून देणार नाही, तोपर्यंत लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही.
भारतीय स्वातंत्र्याची लढाई म्हणजे परकीय विरुद्धची लढाई किंवा ख्रिश्चनाविरोध विरुद्धची लढाई, असा रंग देण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असतात, पण हे खरे नाही, राजकीय स्वातंत्र्य च्या म्हणजेच लोकशाहीच्या ज्या ज्या लढाया लोकांनी लढल्या त्या केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळावे यासाठीच नाही, तर राजकीय स्वातंत्र्य यासाठी मिळवायचे आहे की, आपली गुलामी नष्ट करून हुकूमशाहीला मोठा माती द्यायची आहे, यासाठीच प्रत्येक देशातील लोकांनी लढाया केल्या, जनतेला प्रजा म्हणून राहायचे नव्हते तर आपल्या देशात आपण नागरिक म्हणून राहावे, यासाठी लोकशाही हवी, आणि यासाठीच जनतेने राजकीय लढाया केलेल्या आहेत, खरे तर गुलामी विरुद्धची ही लढाई होती, हुकुमशाही विरुद्धची लढाई होती, हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई होती.
जनतेने स्वदेशी स्वातंत्र्याची लढाई म्हणजेच स्वातंत्र्याचा लढा दिला तो अजून एका कारणासाठी, तो म्हणजे शोषण अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी. स्वातंत्र्यसंग्रामातील नेतृत्वांनी जनतेला वचन दिले होते, विश्वास दिला होता, आशा दाखवली होती, तेही की,” आपण परक्यांना हाकलून देऊन स्वदेशी यांचे आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण केले तर, म्हणजेच लोकशाही आणली तर आपल्या सगळ्यांना अच्छे दिन येतील, आपण सगळे सुखमय आणि शांतीपूर्ण जीवन जगू, कारण लोकशाहीत आपणास मतदानाचा हक्क मिळणार आहे, त्यामुळे आपला राजा आपणच बनवायचा आहे, म्हणजेच आपणच आपल्या देशाचे मालक राहणार आहोत, आपली गुलामी संपुष्टात येणार आहे, आर्थिक दृष्ट्या आपण सबल होणारा आहोत, स्वावलंबी होणार आहोत, एकदा का आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झालो की मग आपली लाचारी आपोआप संपुष्टात येईल, आणि आपण स्वाभिमानाचे जीवन जगू “. अशा प्रकारची आशा जनतेला होती नेतृत्वाला पण होती, पण झाले उलटेच.
जनतेला मतदानाचा हक्क मिळू नये जनता आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाले नाही, त्यांचे शोषण चालूच आहे, आणि त्यांची लाचारी गुलामी पण संपलेली नाही, जे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाले ते स्वाभिमानी बनले नाहीत, उलट आर्थिक दृष्ट्या सबळ होऊनहीं सत्तेसाठी संपत्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी लाचारीच पत्करली.
जनता जाती-अभिमानी आणि धर्म अभिमानी, धर्मांध आहे, जात्यांध आहे, जातीच्या आणि धर्माच्या या आंधळेपणामुळे आपले किती मोठे नुकसान होत आहे, हे जनतेला कळत नाही, आणि त्यांच्या नेत्यांना वळत नाही, यामुळे जात धर्म पैसा या गोष्टीचा लोकशाहीत दुरुपयोग होत आहे.
आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे, बिरसा मुंडा, बसव अण्णा, पेरियार, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स यामा या महामानवाने जो लढा दिला याबरोबरच संत महात्म्यांनी जो उपदेश केला, हा सर्व खटाटोप , देहाची आहुती, केवळ राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही एवढ्या पुरतीच मर्यादित नव्हती, तर हे संत महात्मे महामानव यांचा मुख्य उद्देश जनतेचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक शोषण थांबले पाहिजे तसेच यांचे वरील अन्याय अत्याचार थांबले पाहिजे त, केवळ यासाठीच या थोर पुरुषांचा लढा होता, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वातंत्र्याचा लढा म्हणजे केवळ परकीय विरुद्ध लढा, परकीय धर्माविरुद्ध लढा नसून तो केवळ शोषणाविरुद्धचा आणि अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठीचा स्वातंत्र्याचा लढा आहे, हे जोपर्यंत आपणास ज्ञात होणार नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही याचा अर्थ कळणार नाही.



