Home Social दर्यापूरात काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

दर्यापूरात काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

युवराज डोंगरे/ खल्लार

        उपसंपादक 

   भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस कार्यालय दर्यापूर येथे साजरी करण्यात आली. दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते प्रतिमेची पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

         यावेळी दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिष शिरभाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पाटील भारसाकळे, माजी नगरसेवक असलम भाई घाणीवाले, ऍड. निशिकांत पाखरे, दत्ता पाटील कुंभारकर. विनोद वानखडे,रामभाऊ साखरे, मधुभाऊ घाडगे, आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.