बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भरतशेठ शहा यांना उमेदवारी, देण्यासाठी अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार, व आ. दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून, आणि आप्पासाहेब जगदाळे, यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादीने दिली संधी, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष, नगरसेवक यांची यादी जाहीर करण्यात आली.
यामध्ये नगराध्यक्षपदासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष, इंदापूर अर्बन बँकचे चेअरमन, भरतशेठ शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर नगरसेवकपदासाठी नव्या-जुन्यांचा मेळ घालत यादी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, ते परिपक्व व शांत संय्यमी असून, जनतेच्या मूलभूत गरजा, व प्रश्न काय आहेत ते माहीत आहेत, गोर गरीब लोकांसोबत वावरतात, जनतेच्या मनातील उमेदवार आहेत, ते विक्रमी मताधिक्य मिळवून निवडणुकीत जिंकतील, कारण कोणताही उमेदवार गुंड प्रवृतीचा अथवा सावकार, जनतेला धमकावणारा, अवैध व्यवसाय करणारा अथवा गावात दहशत निर्माण करणारा नाही.
गावातील प्रत्येक गल्ली बोळात एकच चर्चा, नगराध्यक्ष भरतशेठ शहा व सर्व नगरसेवक मिळून, विरोधकांना चारीमुंड्या चित केल्या शिवाय राहणार नाहीत, लोकांत दहशत, दमदाटी करून जनतेला वेठीस धरणारे कार्यकर्ते अथवा उमेदवार राष्ट्रवादीकडे नाहीत. कारण भरतशेठ शहा शांत संय्यमी व मन मिळाऊ नेतृत्व आसल्याने ते सर्वसान्य जनतेचे प्रेरणास्थान आहेत, भविष्यात इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे, जनतेत चर्चा..!



