बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी रविवारी इंदापूर शहरात आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट ) मध्ये जाहीर प्रवेश केला. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री भरणे यांनी भरत शहा आमचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत,’ असे जाहीर करत, अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर पक्ष प्रवेश केला….
इंदापूर येथे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश महाजन यांनी केले.
जुनी बाजारपेठ टिकवू…
भरत शहा यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, इंदापूरची बाजारपेठ कंजस्टेड आहे. नवीन रस्ते, नियोजित हा प्रवेश राजकीय स्वार्थासाठी नव्हे; इंदापूरच्या सर्वांगीण आणि हरित विकासासाठी आहे. अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे हेच शहराला भरघोस निधी देऊ शकतात, म्हणून आम्ही पक्षात आलो आहोत. मागील पंचवार्षिक कामांची पावती जनता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरत शहा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नवी बाजारपेठ उभी करताना जुनी बाजारपेठही टिकवू, हा आमचा बाजारपेठ, वाहतूक सुधारणा या सर्व गोष्टींना प्राधान्य दिले जाईल.
प्रवेशाची कारणे आणि विकासाची हमी..
कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, भरत शहा आणि व्यापारी संघाने मागणी केलेला ३८२ कोटींचा शिरसोडी-कुगाव पूल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मंजूर केला. भारतात इतक्या वेगाने मंजूर झालेला हा पहिला प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला. या पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ पाचपट वाढेल आणि शहरातील वाहतूक व व्यापाराला चैतन्य येईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.शब्द आहे. आमचे पैसे कष्टाचे आहेत, आम्ही पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा आदर्श ठेवू.



