उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
जनतेचे हित बघणारे नेते, कार्यकर्ते क्वचितच!,स्वतःवर संकट आले की,या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या मारतात व स्वतःचे बघतात…
मतदारांना,नागरिकांना उपयोगात आणणारा नेता हा प्रथमदर्शनी स्वतःचे भविष्य बघतोय,”अपना काम बनता,हिच त्यांची निती असते.
जनतेच्या आवश्यक व मुलभूत गरजांकडे आणि हक्कांकडे काळजीपूर्वक लक्ष देणारा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी संघर्ष करणारा नेता आजच्या काळात मिळणे कठीणच!
आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे.मीच जनतेचा नेता किंवा हितेशी म्हणून बरेच चेहरे पुढे असणार…
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीत रुपयांचा,दारुचा, चितळ्याच्या बोलबाला असणार! निवडणूक जिंकण्यासाठी आवाक्याच्या बाहेरच्या तडजोडी होणार,या निवडणूकीतील घडामोडी नेहमीच्याच!
निवडणूक म्हटले की,तोंड फाडून हवसे-गवसे-नवसे असणारच!कुणाची छाती फुगणार तर कुणाचे मन फुलणार आणि कुणी दम भरणार!
सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत कधीकाळी संधीला योग्य ठरवायचे असल्याने चमचागिरीलाही महत्व असणार आणि मंधीमंधी मी हा तोराही प्रखरतेने उजाळून निघणार!…
आता निवडणूक लढण्याची लगबग सुरु झाली,येणाऱ्या काही दिवसात मी तुमचाच आणि तुमच्यासाठी काम करणारा माणूस नाही का?मग द्यानं मला संधी,मी तुम्हाला विसरणार नाही बरं!,”विश्वास दाखवा!…
अनेक शब्दांच्या फेकी,अनेक प्रकारचे प्रलोभने मतदारांना अनुभवायला मिळणार हे खरे….



