ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली – गावात उभा आहे उंच टॉवर – पण नेटवर्कचा पत्ता नाही. मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचण,शेतीसाठी महत्त्वाची माहिती मिळण्यात अडथळे, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सामान्य जनतेला माहिती मिळण्या करिता अडचणी आणि सामान्य जनतेला दैनंदिन संवाद साधणंही कठीण झालंय.
ही अवस्था शासन आणि BSNL प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष देणारी आहे, जनतेच्या पैशातून उभारलेले हे टॉवर आता फक्त लोखंडाचा ढिगारा बनले आहेत.
आजाद समाज पार्टीच्या वतीने प्रशासनाला इशारा….
जर लवकरच टॉवर सुरू करून नेटवर्क सुविधा चालू केल्या नाहीत.तर जनतेच्या प्रश्नांसाठी मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा प्रेम मडावी जमगांव, विनोद मडावी, पोटेगाव धनराज दामले, राजोली यांनी दिला असल्याचे कळते.



