भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील निमगाव येथे तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिनांक 05/11/2025 ला घटस्थापना, सामूदाइक प्रार्थना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दिनांक 06/11/2025 ला पहाटे
सकाळी 5:30=सामुदायिक ध्यान
स. 7:वा.=रामधून
स. 9 वा. ध्वजारोहन मंडळाचे अध्यक्ष मोगरकर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व सोबतच वस्त्रदान कार्यक्रम आई वडिलांची आठवण म्हणून मोगरकर महाराज यांनी वस्त्रदान केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमला गट ग्रामपंचायत मिमनवाडाचे उपसरपंच चेतन भाऊ सुरपाम,निमगावचे पो.पा. ज्ञानेश्वर गावडे, गणपती चापले,केशव मेश्राम,मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम जी राजगडे तसेच कोषाध्यक्ष आनंदराव जी वरखडे,मंडळाचे सचिव भगवान खोब्रागडे, व पांडुरंग मेश्राम, दिलीप जी वासेकर, मुरलीधर कुळमेथे, प्रमोद जी बोबटे, वासुदेव जी शेडमाके, लालाजी वरखडे, बाबुराव होळी, यशवंत जी शेडमाके, तुळशीदास जी कुकडकर, लालाजी चापले, लालाजी नगराळे यमुणा सहारे,जिजाबाई मेश्राम, शकुंतला मोंगकर, शोभा मेश्राम, यशोदा वरखडे, करुणा वासेकर, बारूबाई कुमरे, वंचला कुक डकर, गयाबाई वाघाडे, वनिता बाई कुळमेथे व समस्त निमगाव ग्रामवासीय यांच्या सौजन्याने त्रिसूत्री कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.



