उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे जुनी परीवारा तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा गुरु नानक देव जी चा ५५६ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोज रविवारला साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात गुरुनानक देवजी यांच्या जीवनाबद्दल व सर्व धर्माच्या कल्याणाबद्दल महत्वाची माहीती देण्यात येते.
शिख धर्माचे प्रथम गुरू,गुरूनानक देवजी चा प्रकाश पर्व (जयंती) कार्यक्रम सुरवात करण्यात येते.दरवर्षी प्रमाणे आज ही या जयंती निमित्त जांभुळघाट येथे सातसंगत एकत्रीत येत असते.
यावेळेस सुखमनी पाठची समाप्ती केली जाते.त्या नंतर अरदास व गुरूनान देव जी यांच्या शिक्षण व देव रूपीची मोलाची माहीती ठरावीक व्यक्ती कडून केली जाते.या वेळी सुखमनी साहाब ची समाप्ती पाट्टी स.जरनेलसिंग टॉक रा.( हिंघणघाट) यांनी केली.
त्या नंतर गुरूनान देवजी बद्दल मोलाचे मार्गदशन पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी(गडचिरोली) व हट्टीलासिंग डांगी (ठानेगाव) यांनी मोलाची माहीती दिली.
त्या नंतर काही व्यक्तींचा सत्कार करण्यात आलाय.या कार्यक्रमाचे संचालन कूलदिपसिंग अंध्रेले (वाहनगाव) व आभार स.अदबसिंग जुनी यांनी केली.त्या नंतर लंगर (महाप्रसाद ) चा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी सर्व एकत्रीत येऊन या कार्यक्रमात सहभागी झाल्याने प्रकाश पर्व चा कार्यक्रम जांभुळघाट जुनी परीवार तर्फे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.



